scorecardresearch

समाजवादी पार्टी

समाजवादी पक्ष (Samajwadi Party) हा भारतातील एक प्रमुख राजकीय पक्ष असून तो उत्तर प्रदेश राज्यात सक्रिय आहे. या पक्षाची स्थापना ४ ऑक्टोबर १९९२ रोजी झाली होती. दिवंगत मुलायमसिंह यादव हे या पक्षाचे संस्थापक आहेत. त्यांचे पुत्र तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. सध्या ३७ सदस्यांसह समाजवादी पक्ष हा लोकसभेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे.


पक्षाचे बलस्थान हे उत्तरप्रदेश असले तरी देशातील इतर राज्यांमध्येही या पक्षाची लक्षणीय उपस्थिती आहे. पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये ४ वेळा सत्ता स्थापन केली आहे. तीन वेळा मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वात तर एक वेळा त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव यांच्या नेतृत्तवात. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पराभव पत्करावा लागला होता. ४०३ जागांपैकी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस युतीला केवळ ४७ जागांवर यश मिळाले. तर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३१२ जागा जिंकत राज्यात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन केली होती. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतही समाजवादी पक्षाचा पराभव झाला होता. समावादी पक्ष युतीला केवळ १११ जागा जिंकता आल्या. तेव्हाही राज्यात भाजप आघाडीने बहुमत मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली.


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाकडून भाजपला मोठा फटका बसला होता. पक्षाला केवळ ५ जागा जिंकता आल्या. त्यानंतर अलिकडेच हा पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने ३७ जागा जिंकल्या आणि १८ व्या लोकसभेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा पक्ष झाला.


Read More
Marathi Unification Committee demands registration of case against Abu Azmi
मराठीचा अपमान करणाऱ्या अबू आझमी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा- मराठी एकीकरण समितीची मागणी

आझमी यांचे विधान बेजबाबदार व असंवैधानिक असल्याचा आरोप करून त्यांच्यावर गुन्हा दखल करावा, अशी मागणी मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आली…

crime
मालेगावात समाजवादी पार्टी-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा ; मारहाणीत सहा जण जखमी

समाजवादी पार्टी व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शहरातील अमन चौकात शनिवारी रात्री जोरदार राडा झाला आहे. दोन्ही गटांनी लाठ्या-काठ्या व लोखंडी नळ्यांनी…

Samajwadi Party slogans against Nathuram Godse
महात्मा गांधी जयंतीला समाजवादी पार्टीतर्फे नथुराम गोडसे यांच्या विरोधात नारेबाजी

पक्षाचे नेते मुस्तकीम डिग्निटी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व केंद्रातील भाजप सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल ताशेरे ओढले.

समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आझम खान (छायाचित्र पीटीआय)
Visual Storytelling : आझम खान समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी देणार? तुरुंगातून सुटका होताच ‘या’ पक्षात करणार प्रवेश?

Azam Khan Out of Jail : तुरुंगातून सुटका होताच आझम खान हे समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा उत्तर प्रदेशच्या…

Azam Khan political career
सपचे आझम खान यांची जामिनावर सुटका

खान यांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर तुरुंगाबाहेर तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाकडून परिसरात वाहनांना प्रतिबंध करण्यात आला होता.

pooja pal SP MLA Alleges Death Threats Blames Akhilesh
“नवऱ्याप्रमाणे माझीही हत्या होईल”, पक्षातून हकालपट्टी झालेल्या महिला आमदाराचे अखिलेश यादवांवर गंभीर आरोप; कारण काय?

Pooja Pal suspension पूजा पाल यांनी पक्ष आणि पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

‘या’ पक्षातून हकालपट्टी झालेल्या महिला आमदार करणार भाजपा प्रवेश? आगामी निवडणुकांमध्ये ठरणार का भाजपासाठी ओबीसींचा नवा चेहरा?

सध्या तरी पूजा पाल यांच्या भाजपा प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, अखिलेश यादव यांच्यावरील तीव्र टीका आणि योगी…

डिंपल यादव समाजवादी पक्षाचा राष्ट्रीय चेहरा म्हणून प्रस्थापित होत आहेत का?

२०२४ च्या निवडणुकीआधी ऑक्टोबर २०२३ मध्ये डिंपल यांनी चेन्नईतील द्रमुक पक्षाने आयोजित केलेल्या महिला हक्क परिषदेच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.…

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व समाजवादी पार्टीच्या आमदार पूजा पाल (छायाचित्र पीटीआय)
योगी आदित्यनाथांचं कौतुक करणाऱ्या महिला आमदाराची पक्षातून हकालपट्टी; कोण आहेत पूजा पाल? फ्रीमियम स्टोरी

Pooja Pal Expulsion : आमदार पूजा पाल यांची समाजवादी पार्टीने पक्षातून हकालपट्टी केली आहे, नेमकं काय आहे यामागचं कारण? जाणून…

Expelled SP MLA Pooja Pal
MLA Pooja Pal: योगी आदित्यनाथ यांची स्तुती केल्यामुळे अखिलेश यादव यांनी महिला आमदाराची पक्षातून केली हकालपट्टी, पूजा पाल म्हणाल्या, “माझ्या पतीची हत्या…”

Expelled SP MLA Pooja Pal: समाजवादी पक्षाच्या आमदार पूजा पाल यांनी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती केली यामुळे…

संबंधित बातम्या