स्टेट बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही भारतातील सर्वात मोठ्या बॅंकापैकी एक बॅंक आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये भारताचे बंगाल, मद्रास आणि बॉम्बे अशा तीन प्रांतांमध्ये विभाजन करण्यात आले होते. या तिन्हीही प्रांतांमध्ये ब्रिटीशांद्वारे ‘बॅंक ऑफ बंगाल’, ‘बॅंक ऑफ मद्रास’ आणि ‘बॅंक ऑफ बॉम्बे’ या बॅंकांची स्थापना करण्यात आली होती. पुढे १९२१ मध्ये या तिन्ही बॅंकांचे एकीकरण करुन ‘इंपीरियल बँक ऑफ इंडिया’ची स्थापना करण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जुलै १९५५ मध्ये ‘इंपीरियल बँक ऑफ इंडिया’चे नाव बदलून ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’ ठेवले गेले. शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास ही बॅंक जगातली सर्वात मोठी बॅंक ठरु शकते. या बॅंकेचे मुख्यालय मुंबई शहरामध्ये आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियातर्फ ग्राहकांना नानाविध प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. इतर देशांमध्येही या बॅंकेचे जाळे पसरले आहे. Read More
या परीक्षाना बसणाऱ्यांना लोकलच्या रविवारच्या वेळापत्रकाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असून रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक…
SBI Bank Robbery in Karnataka: कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील SBI बँकेत दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला. मनी हाईस्ट वेबसीरीजप्रमाणे चोरट्यांनी कोट्यवधींचा मुद्देमाल…
भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांना कंपन्यांच्या विलीनीकरणासाठी कर्ज देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जोर…