scorecardresearch

शरद पवार

sharad pawar

शरद पवार हे भारतातील प्रमुख राजकारण्यांपैकी एक आहेत. शरद पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुण्यातील बारामती तालुक्यात झाला. ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारण करणारे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. काँग्रेसपासून वेगळे होऊन त्यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना केली. मात्र २०२३ साली झालेल्या पक्षातील फुटीनंतर आता त्यांच्या पक्षाचे नाव “राष्ट्रवादी कांग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष”, असे आहे. तर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याकडे आहे.


शरद पवारांनी १९६० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९६७ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीमधून विधानसभेवर निवडून आले आणि १९७८ मध्ये महाराष्ट्राचे सर्वात कमी वयातील मुख्यमंत्री झाले. त्यांनी तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. १९८४ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. केंद्रातही त्यांनी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळून त्यावर आपली छाप सोडली. राजकारणाबरोबरच शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.


आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, अंडरवर्ल्ड संबंध याशिवाय अनेक वाद झाले. तरीही चाणाक्ष पुढाऱ्याप्रमाणे त्यांनी विविध पक्षांसह युती करुन आपले राजकीय अस्तित्व आजही अबाधित ठेवले आहे. २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांना एकत्र आणत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. शरद पवारांच्या या खेळीमुळे १०६ आमदार असलेल्या भाजपाला अडीच वर्ष सत्तेपासून दूर राहावे लागले.


२०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घेतला. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधिमंडळात अजित पवार हा दावा टिकवण्यात यशस्वी झाले. पक्ष फुटीनंतरही शरद पवार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज देत १० उमेदवारांपैकी ८ उमेदवार जिंकून आणण्यात यश मिळवले. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाला एकच खासदार निवडून आणता आला. या निवडणुकीत शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका झाली. ते नेतृत्व सोडत नसल्याचा आरोप अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या नेत्यांनी केला. तरीही हे हल्ले पचवून शरद पवारांनी आपल्या पक्षाला यश मिळवून दिले.


Read More
ex mp navneet rana reaction
“लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोणी सेटिंग केली होती”, नवनीत राणांचा शरद पवारांना सवाल….

राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही एक खळबळजनक दावा केला आहे.

Sharad Pawar avoids commenting on Modis diplomacy
शरद पवारांनी मोदींच्या डिप्लोमसीवर भाष्य टाळले, पण ट्रम्पबाबत म्हणाले ‘ते अनकंट्रोल्ड’

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्क्यांवरून ५० टक्के कर वाढवला आहे. याला उत्तर देण्यास भारताच्या परराष्ट्र धोरणात अपयश…

sharad pawar ncp State President Shashikant Shinde in Nagpur
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला गळती… प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे स्पष्टच म्हणाले…

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे नागपुरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना म्हणाले, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत…

Sharad Pawar On Eknath Shinde
Sharad Pawar : ‘उपमुख्यमंत्री शिंदेंची पुढची भूमिका काय असेल? हे लवकरच…’, शरद पवारांचं मोठं भाष्य

शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून विचारलेल्या प्रश्नावर बोलताना एक मोठं विधान केलं.

शरद पवार यांनी केलेल्या खळबळजनक खुलाशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra Fadnavis : शरद पवारांच्या १६० जागा जिंकून देण्याबाबतच्या खुलाशानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राहुल गांधी यांच्या…”

शरद पवार यांनी केलेल्या खळबळजनक खुलाशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar demand EC probe
मत चोरीवर मुख्यमंत्री फडणवीस का बोलतात? शरद पवार यांचा सवाल

नागपूर पत्रकार क्लब तर्फे शरद पवार यांच्याशी आज वार्तालाप आयोजित केला होता त्याप्रसंगी ते एका प्रश्नाच्या उत्तरात असे म्हणाले.

Sharad Pawar
Sharad Pawar : ‘विधानसभेआधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती’, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

‘विधानसभेच्या निवडणुकी आधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती’, असं मोठा विधान शरद पवार यांनी केलं आहे.

Sharad Pawar on Vote Theft Allegations
मतचोरी प्रकरणी सखोल चौकशी व्हावी – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) ओबीसी सेलतर्फे आज क्रांती दिनी राज्यभर मंडल यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेला पक्षाचे राष्ट्रीय…

Sharad Pawar to launch NCP Mandal Yatra in Nagpur Maharashtra politics update
शरद पवार दिल्लीहून थेट नागपुरात

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी (९ ऑगस्ट) मंडल यात्रा काढण्यात येणार असून तिचा शुभारंभ त्यांच्या पवार यांच्या हस्ते व्हेरायटी चौक, आशीर्वाद लॉन…

sharad pawar mandal yatra
संघ भूमीतून शरद पवारांची ‘मंडल यात्रा’ प्रीमियम स्टोरी

मंडल आयोगाला भाजपने विरोेध केला होता. अडवाणी यांच्या श्रीराम रथयात्रेला ‘कमंडल’ यात्रा म्हणून भाजप विरोधकाकडून संबोधले जात होते.

इंडिया आघाडीचे दिल्लीत स्नेहभोजन, २५ पक्षांचे ५० नेते उपस्थित; नेमकी काय चर्चा झाली?

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोग आणि भाजपावर हल्ला केला.

Thane Jitendra Awhads birthday banner is being discussed everywhere
राज-उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींचा एकत्रित फोटो; जितेंद्र आव्हाडांच्या वाढदिवसाच्या बॅनरची सर्वत्र चर्चा

राष्ट्रावादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) नेते जिंतेद्र आव्हाड यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरासह इतर शहरातील कार्यकर्त्यांकडून बॅनर…

संबंधित बातम्या