फेब्रुवारी २०२२ पासून रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे. रशियाचे प्रमुख व्लादिमिर पुतिन यांनी २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियन नागरिक आणि सैन्याला संबोधन करत भाषण दिले. या भाषणेच्या शेवटी त्यांनी युद्धाची घोषणा केली. हे भाषण जगभरामध्ये दाखवण्यात आले होते. त्यानंतर रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला चढवला. रशियाच्या विरुद्ध असलेल्या नाटो संघामध्ये युक्रेन सहभागी होण्याचा प्रयत्न करत होता. असे झाल्याने त्यांच्या शेजारी नाटो संघातील देशांचे सैन्य पोहोचले असते. याशिवाय अन्य काही अंतर्गत मुद्द्यांवरुन या दोन्ही शेजारी देशांमध्ये वाद होते. या युद्धामध्ये आत्तापर्यंत दोन्ही देशांचे खूप नुकसान झाले आहे. युद्धाच्या सुरुवातीच्या काही महिन्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला होता. दरम्यानच्या काळामध्ये जगाभरातील बहुतांश देश युक्रेनच्या बाजूने होते. Read More
Modi-Putin: नरेंद्र मोदी यांनी युक्रेन युद्धाच्या धोरणावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी थेट चर्चा केल्याचा दावा केल्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने नाटो…
Russia Bans Fuel Exports : युक्रेनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे रशियाच्या तेल शुद्धीकरणाच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. परिणामी तेलाच्या उत्पादनात काही प्रमाणात…