scorecardresearch

आषाढी वारी २०२५ Photos

वारी (Wari) पुंडलिकाला भेटण्यासाठी साक्षात श्रीकृष्ण पंढरपूरला आले. तेव्हा आई-वडिलांची सेवा करतोय, बाहेरच थांब असं पुंडलिकाने साक्षात श्रीहरी यांना सांगितले आणि बाजूला असलेली वीट घराबाहेर फेकली. त्या विटेवर श्रीकृष्ण उभे राहत त्यांनी पांडुरंग, विठ्ठलाचे रुप घेतले. ज्या ठिकाणी विठ्ठल विटेवर उभी राहिले, तेथे विठ्ठल-रखुमाईचे मंदिर तयार करण्यात आले.


वारकरी संप्रदायातील भक्तमंडळी दरवर्षी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारी करतात. एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरपर्यंत केली जाणारी पदयात्रा म्हणजे वारी होय. वारकरी संप्रदायालाच भागवत धर्म किंवा भागवत संप्रदाय असेही म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार, एकूण १२ महिन्यांमध्ये ४ वेळा वारी असते. त्यातील प्रमुख वारी म्हणजे आषाढी वारी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तगण आपापल्या गावातून बाहेर पायी चालत एकत्र येतात. अनेकजण आपल्यासह पालख्या देखील घेऊन येत असतात.


आषाढी वारीमध्ये (Ashadhi Wari)भक्त पायी चालत असताना वारीचा मार्ग हा विविध संताच्या कर्मभूमीला लागून जातो. यामध्ये देहू, आळंदी अशा पवित्र स्थळांचा समावेश असतो. वारीसह संताच्या पालख्या देखील पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यामध्ये आषाढी वारी असते. वारी ठराविक ठिकाणी मुद्दामाला असते. त्यात रिंगण हे विशेष आकर्षण पाहायला लोक लांबून येत असतात. आषाढी व्यतिरिक कार्तिकी वारीलाही वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्व आहे. कार्तिकी वारीमध्ये आषाढी वारीच्या उलट संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात. या शिवाय माघ आणि चैत्र महिन्यातही वारी असते. वारी यावरुनच या संप्रदायाचे नाव पडले आहे – वारी करणारे म्हणजे वारकरी. तेराव्या शतकामध्ये वारीचा उल्लेख पाहायला मिळतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या घराण्यात वारीची परंपरा होती. मिळालेल्या माहितीनुसार, हैबतबाबा आरफळकर यांच्यामुळे वारीमधील पालख्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. ते सातारा जिल्ह्यातील आरफळ या गावचे देशमुख होते. त्यांच्यामुळे आजच्या युगातही वारीची परंपरा जगभरात पोहोचली असे म्हटले जाते.


Read More
Shilpa Thakre Ashadhi Ekadashi 2025
9 Photos
Photos: आषाढी एकादशीनिमित्त मराठी अभिनेत्रीचं विठ्ठलाच्या रुपात सुंदर फोटोशूट

या फोटोशूटला तिने ‘पांडुरंगाच्या पायाशी मनाची अर्पण… आषाढी एकादशीच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा…’ असे कॅप्शन दिले होते.

Amruta Fadnavis Ashadhi Ekadashi 2025 Look
10 Photos
केशरी पैठणी साडी, मंगळसूत्राची सुंदर डिझाईन..; अमृता फडणवीस यांच्या महापूजेनिमित्त केलेल्या लूकची चर्चा

पैठणी साडीतील लूकवर अमृता यांनी सुंदर मेकअप करत केसांची वेणी बांधून हेअरस्टाईल केली होती.

ashadhi eakadashi 2025
9 Photos
Ashadhi ekadashi 2025: विठुनामाच्या गजरात दुमदुमले पंढरपूर; आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांची अलोट गर्दी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठल दर्शन, पालख्या आणि भक्तिरसात न्हालेली संपूर्ण नगरी.

DCM eaknath shinde
10 Photos
Ashadhi Ekadashi 2025: वडाळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल पूजन; राज्याच्या कल्याणासाठी घातले साकडे

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नीसमवेत वडाळ्यातील प्राचीन विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले. त्यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करत राज्याच्या सुख,…

vitthal rukmini
9 Photos
Ashadhi Ekadashi 2025: शास्त्रानुसार उपवासाची संपूर्ण माहिती; कसे कराल व्रत, काय पाळाल नियम?

आषाढी एकादशी २०२५ ही ६ जुलै रोजी साजरी होणार असून, उपवास, हरिपाठ आणि विठ्ठलभक्तीचा उत्सव मोठ्या श्रद्धेने पार पडणार आहे.…

Devendra Fadnavis Shri Vitthal Rukmini Mahapooja
12 Photos
Ashadhi Ekadashi 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा; पाहा गाभाऱ्यातील फोटो

महापूजेनंतर फडणवीस यांनी राज्यातील जनतेसाठी सुख, समृद्धी आणि शांततेची प्रार्थना केली.

Rinku Rajguru Ashadhi Ekadashi 2025 Wari
9 Photos
Ashadhi Ekadashi 2025: ‘वारकऱ्यांची गर्दी, पण तरीही मन शांत…’; रिंकू राजगुरूचे वारीतील फोटो पाहिलेत का?

आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा एक जीवंत उत्सव आहे. पंढरपूरची वारी ७०० वर्षांहून अधिक काळ चालत आलेली आहे.

Kartiki Gaikwad Pise Ashadhi Ekadashi 2025
9 Photos
Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीनिमित्त कार्तिकी गायकवाडचं साडीत सुंदर फोटोशूट

कार्तिकीची दोन गाणी ‘माझी मुक्ताई मुक्ताई…’ आणि ‘काय वर्णू तुटक्या शब्दी पांडुरंगा तुझी ख्याती…’ युट्यूबवर चॅनेलवर प्रदर्शित झाली आहेत.