scorecardresearch

वारी Photos

वारी (Wari) पुंडलिकाला भेटण्यासाठी साक्षात श्रीकृष्ण पंढरपूरला आले. तेव्हा आई-वडिलांची सेवा करतोय, बाहेरच थांब असं पुंडलिकाने साक्षात श्रीहरी यांना सांगितले आणि बाजूला असलेली वीट घराबाहेर फेकली. त्या विटेवर श्रीकृष्ण उभे राहत त्यांनी पांडुरंग, विठ्ठलाचे रुप घेतले. ज्या ठिकाणी विठ्ठल विटेवर उभी राहिले, तेथे विठ्ठल-रखुमाईचे मंदिर तयार करण्यात आले.


वारकरी संप्रदायातील भक्तमंडळी दरवर्षी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारी करतात. एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरपर्यंत केली जाणारी पदयात्रा म्हणजे वारी होय. वारकरी संप्रदायालाच भागवत धर्म किंवा भागवत संप्रदाय असेही म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार, एकूण १२ महिन्यांमध्ये ४ वेळा वारी असते. त्यातील प्रमुख वारी म्हणजे आषाढी वारी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तगण आपापल्या गावातून बाहेर पायी चालत एकत्र येतात. अनेकजण आपल्यासह पालख्या देखील घेऊन येत असतात.


आषाढी वारीमध्ये (Ashadhi Wari)भक्त पायी चालत असताना वारीचा मार्ग हा विविध संताच्या कर्मभूमीला लागून जातो. यामध्ये देहू, आळंदी अशा पवित्र स्थळांचा समावेश असतो. वारीसह संताच्या पालख्या देखील पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यामध्ये आषाढी वारी असते. वारी ठराविक ठिकाणी मुद्दामाला असते. त्यात रिंगण हे विशेष आकर्षण पाहायला लोक लांबून येत असतात. आषाढी व्यतिरिक कार्तिकी वारीलाही वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्व आहे. कार्तिकी वारीमध्ये आषाढी वारीच्या उलट संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात. या शिवाय माघ आणि चैत्र महिन्यातही वारी असते. वारी यावरुनच या संप्रदायाचे नाव पडले आहे – वारी करणारे म्हणजे वारकरी. तेराव्या शतकामध्ये वारीचा उल्लेख पाहायला मिळतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या घराण्यात वारीची परंपरा होती. मिळालेल्या माहितीनुसार, हैबतबाबा आरफळकर यांच्यामुळे वारीमधील पालख्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. ते सातारा जिल्ह्यातील आरफळ या गावचे देशमुख होते. त्यांच्यामुळे आजच्या युगातही वारीची परंपरा जगभरात पोहोचली असे म्हटले जाते.


Read More
12 Photos
Photos: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी देहू सज्ज; मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

टाळ- मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकारामाच गजर करत एक-एक पाऊलवाट तुडवत वारकरी पंढरीच्या दिशेने आज वाटचाल करणार आहे.

Shegaon Gajanan Maharaj Palkhi Photos
9 Photos
Photos: ‘श्रीं’च्या पालखीचे पंढरपूरला प्रस्थान; मंगल वाद्यांचा निनाद अन ‘गण गण गणात बोते’चा घोष

आज ज्येष्ठ शुद्ध सप्तमी अर्थात २६ मे रोजी रोजी पारंपरिक पद्धतीने प्रस्थान सोहळा पार पडला.

Samata Wari Warkari Pandharpur collage
19 Photos
Photos : ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’; संविधानातील मूल्यांचा प्रसार करत समता दिंडी पंढरपूरकडे रवाना

सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीचीच चर्चा आहे. हजारो कष्टकरी आपल्या शेतीची कामं बाजूला ठेऊन तन्मयतेने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दिंडीत चालत आहेत.…

Saint Dyaneshwar Maharaj Palki Jejuri Maharashtra
15 Photos
Photos: “भक्तिचैतन्याची वारी, आली मल्हारीच्या दारी..” जेजुरीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी भंडाऱ्यात न्हाली

भक्तिचैतन्याची वारी, आली मल्हारीच्या दारी वैष्णवांची मने आनंदली, माउली भंडाऱ्यात न्हाली…

21 Photos
Photos: हरिभक्तीच्या हिरवाईत नटली, दिवे घाटातली नागमोडी वाट…

पुण्यामध्ये पहाटे माउलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याने सासवडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

18 Photos
Photos : देहूत ३२९ दिंड्यांसह मोठ्या प्रमाणात वारकरी येणार, संत तुकोबा पालखी प्रस्थानाच्या तयारीचे खास फोटो…

दोन वर्षानंतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकोबांचा पालखी सोहळा पार पडणार आहे. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)