स्नेहा कासुर्डे
स्नेहा कासुर्डे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग, लाईफस्टाईल, हेल्थ, करिअर, रेसिपी यासंदर्भातल्या सर्व बातम्या त्या करतात. साठ्ये कॉलेजमधून (मुंबई विद्यापीठ) पत्रकारितेची पदविका मिळवली. पत्रकारितेची सुरुवात ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीत असिस्टंट प्रोड्युसर या पदापासून केली. त्यानंतर ‘लोकशाही’ या वृत्तवाहिनीत बुलेटीन प्रोड्युसर या पदाची जबाबदारी सांभाळली. ब्रेकिंग न्यूज, स्क्रिप्ट रायटिंग, अँकर स्क्रिप्ट, स्पेशल इंव्हेट रिपोर्टींग, व्हिडीओ एक्सप्लेनर अशा प्रकारची कामे वृत्तवाहिन्यांमध्ये केली. त्यांच्याकडे एकूण साडे तीन वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे. चित्रपट पाहणं, वाचन करणं, ट्रेकिंग करणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात त्यांना रस आहे. स्नेहा कासुर्डे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.