आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्याच महिन्यात त्यांच्यावर मुंबई व पुण्यात दाखल असणारे सर्व गुन्हे उच्च न्यायालयाने रद्द ठरवले. त्यापाठोपाठ सायबर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपासही बंद करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आता राज्यातल्या सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असणाऱ्या रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात होतं. त्यानुसार आता त्यांची नियुक्ती पोलीस महासंचालक म्हणून करण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक्सवर (ट्विटर) याची माहिती देणारी पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुधीर मुनगंटीवार यांची पोस्ट

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात “महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महांचालकपदी श्रीमती रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्याचे मन:पूर्वक अभिनंदन!” असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तत्कालीन मंत्री बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांचे फोन टॅप केल्याचे आरोप रश्मी शुक्लांवर करण्यात आले होते.

विश्लेषण : रश्मी शुक्लांवरील सर्व गुन्हे रद्द झाले.. पुढे?

२०१९ मध्ये मविआचं सरकार स्थापन होण्याच्या काळात रश्मी शुक्ला यांनी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याचा दावा करण्यात आला. या नेत्यांचे फोन टॅप करण्याची परवानगी मागताना त्यांची नावे बदलून ही परवानगी घेण्यात आली. यात संजय राऊतांसाठी एस रहाते तर एकनाथ खडसे यांच्यासाठी खडासने असी नावं टाकल्याचाही आरोप करण्यात आला. त्याशिवाय नाना पटोलेंसाठी अमजद खान या ड्रगमाफियाच्या बोगस नावाचा वापर करण्यात आल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं.

उच्च न्यायालयाचे निर्देश

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीमध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई व पुण्यात दाखल करण्यात आलेले गुन्हे उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl rashmi shukla appointed as dgp maharashtra by eknath shinde government pmw