बॉलीवूड कलाकार त्यांच्या कामांबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. यापैकीच एक कारण म्हणजे त्यांच्या आलिशान गाड्या. अनेक कलाकारांना गाड्यांची आवड आहे आणि ते वरचेवर नवनवीन कार्सही खरेदी करीत असतात. अभिनेता अजय देवगण याने नुकतीच एक नवीन आलिशान गाडी खरेदी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजय देवगणला गाड्यांची प्रचंड क्रेझ आहे. बऱ्याच वेळा तो, त्याची पत्नी काजोल, त्यांची लेक नीसा महागड्या गाड्यांमधून फिरताना दिसतात. अजयकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू अशा गाड्या आहेत. पण याचबरोबर आता या गाड्यांच्या ताफ्यामध्ये एक नवी कोरी इलेक्ट्रिक कार सामील झाली आहे.

आणखी वाचा : “आई-वडील असताना संस्कारी अन् ओरिबरोबर…” न्यासा देवगण ‘त्या’ व्हिडीओमुळे पुन्हा एकदा ट्रोल

हेही वाचा : ‘दृश्यम २’पाठोपाठ ‘भोला’ चित्रपटासाठीही अजय देवगणने आकारलं मोठं मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

अजय देवगणने नुकतीच BMW i7 ही इलेक्ट्रिक कार खरेदी केली. या कारची शोरूम किंमत १ कोटी ९५ लाख आहे. इलेक्ट्रिक गाडी ट्वायलाइट पर्पल रंगाची आहे. इलेक्ट्रिक गाडीला BMW ची iDrive 8 ऑपरेटिंग सिस्टम तसंच सीटच्या वर रूफ टॉपला स्ट्रीमिंगसाठी Amazon Fire TV सपोर्ट करणारा ३१.३-इंच 8K स्क्रीन बसवला आहे. जो स्क्रीन आपल्याला नको असेल तेव्हा दुमडला जाऊ शकतो

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor ajay devgan buys brand new bmw i7 electric car know its price and features rnv