scorecardresearch

Premium

“आई-वडील असताना संस्कारी अन् ओरिबरोबर…” न्यासा देवगण ‘त्या’ व्हिडीओमुळे पुन्हा एकदा ट्रोल

तिने परिधान केलेले कपडे चर्चेचा विषय ठरतात. बऱ्याचदा तिला तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ट्रोलही केलं जातं. 

nyasa

अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगणने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वीच चर्चेत राहायला सुरुवात केली आहे. न्यासा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असलेल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. अनेकदा ती विविध पार्ट्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असते. पण दरवेळी तिने परिधान केलेले कपडे चर्चेचा विषय ठरतात. बऱ्याचदा तिला तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ट्रोलही केलं जातं. आता पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

अजय आणि काजोलची लेक न्यासाच्या २०२२ च्या ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टीमधील बोल्ड लूकने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळी तिचे आणि बिझनेसमनचा मुलगा ओरहान अवत्रमणीबरोबरचे मिठी मारून काढलेले फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. तिच्या त्या बोल्ड अंदाजमुळे ती खूप ट्रोल झाले होती. त्या तिच्या ग्लॅमरस स्टाईलनंतर काही दिवसांपूर्वी ती काजोलबरोबर पंजाबी ड्रेस आणि सध्या लूकमध्ये सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी आली होती. तर आता ती पुन्हा एकदा संस्कारी लूकमध्ये दिसली.

Gurmeet Choudhary Gives Cpr To man on raod
Video: गुरमीत चौधरीने भर रस्त्यात पडलेल्या व्यक्तीचा वाचवला जीव, अभिनेत्याची कृती पाहून तुम्हीही कराल कौतुक
Ketaki Chitale post on Nanded Govt Hospital death case
“संडास साफ करा हे त्याची जात बघून…”, नांदेडमध्ये रुग्णांच्या मृत्यूनंतर डीनबरोबर घडलेल्या प्रकारावर केतकी चितळेची पोस्ट
mugdha prathamesh
प्रथमेश लघाटे मुग्धा वैशंपायनला ‘या’ नावाने मारतो हाक, गायकाने शेअर केलेल्या स्टोरीने वेधलं लक्ष
kareena-kapoor-about-taimur
तैमुरच्या नावामुळे झालेल्या ट्रोलिंगबद्दल करीना कपूरने प्रथमच मांडली स्वतःची बाजू; हे नाव का ठेवलं? याचंही दिलं उत्तर

आणखी वाचा : अनंत अंबानीने साखरपुड्यात घातला होता ‘कार्टियर पँथर ब्रोच’, किंमत वाचून व्हाल थक्क

नुकतीच वडिलांसोबत विमानतळावर दिसली. यावेळी ती गुलाबी फुल स्लीव्ह टॉप आणि जीन्स परिधान केली होती. न्यासाचा बदललेला लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ओरीबरोबर असताना ग्लॅमरस लूक आणि आई-वडिलांबरोबर असताना अंगभर कपडे असा न्यासाचा बदलणार लूक पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

हेही वाचा : न्यासा देवगणच्या न्यू इअर सेलिब्रेशनचे ‘ते’ फोटो पाहून नेटकरी संतापले, म्हणाले “आई-वडिलांची अब्रू धुळीला…”

अजय देवगणबरोबरचा तिचा विमानताळावरचा व्हिडीओ पाहून लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा ती ट्रोल होत आहे. एक नेटकरी म्हणाला, “आई-बाबांबरोबर असताना न्यासा खूप साधी असते आणि ओरीबरोबर असताना तिचे रंग बदलतात. तर दुसरा म्हणाला, “मेकअप नसेल तर ही अजिबात ओळखू येत नाही.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “वडिल बरोबर असल्यावर हीचे कपडे व्यवस्थित असतात.” आता तिचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kajol and ajay devgan daughter nyasa devgan got trolled for her looks rnv

First published on: 02-02-2023 at 18:29 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×