अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कमाई केली. ‘दृश्यम २’ला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. आता अजयच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट म्हणजे 'भोला.' नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटातील अजय देवगणचा अंदाज सर्वांनाच भावला. पण या चित्रपटासाठी त्याने मानधनही तितकंच मोठं आकारलं आहे. अजय देवगणने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटातील त्याचा लूक, त्याची देहबोली, त्याची अ ॅक्शन हे सगळं पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. फक्त इतकंच नाही ही सगळी मेहनत करण्यासाठी त्याने या चित्रपटासाठी किती रक्कम आकारली हेही आता समोर आलं आहे. आणखी वाचा : रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ची पहिल्या दिवशी दमदार कमाई, चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी मीडिया रिपोर्टसनुसार अजय देवगणने 'भोला' चित्रपटातील सर्व स्टारकास्टपेक्षा सर्वात जास्त मानधन आकारलं आहे. हा चित्रपट त्याच्या कारकीर्दीतील त्याने जास्त मानधन घेतलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. या चित्रपटासाठी त्याने तब्बल ३० कोटी फी म्हणून घेतले आहेत. हेही वाचा : ‘दृश्यम २’साठी अजय देवगणने आकारलं ‘इतके’ कोटी मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क ‘भोला’ हा दाक्षिणात्या चित्रपट ‘कॅथी’चा हिंदी रिमेक आहे. अजय-तब्बू यांच्याबरोबरच या चित्रपटात राय लक्ष्मी, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा आदी कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या महिन्यात ३० मार्चला ‘भोला’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.