बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या ‘स्त्री २’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीने २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी २’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिच्या पहिल्या चित्रपटात श्रद्धाने अभिनेता आदित्य रॉय कपूरबरोबर स्क्रीन शेअर केली होती. अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर श्रद्धाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती.

श्रद्धा कपूर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या जामनगर येथे पार पडलेल्या पहिल्या प्री-वेडिंग सोहळ्याला तिच्या कथित बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली होती. एवढंच नव्हे तर श्रद्धा विमानतळावर आदित्य रॉय कपूर आणि राहुल मोदी यांची भेट घालून देतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याशिवाय एका फोटोमध्ये श्रद्धाने गळ्यात ‘R’ अक्षर असलेलं पेडंट घातलं होतं. यावरून अभिनेत्री राहुल मोदीला डेट करत असल्याच्या चर्चा सर्वत्र चालू झाल्या. परंतु, श्रद्धाने याबाबत कुठेही भाष्य केलं नव्हतं किंवा राहुलबरोबर एकही फोटो शेअर केला नव्हता. अशातच इन्स्टाग्राम स्टोरीवर राहुल अन् तिचा एकत्र फोटो शेअर करत श्रद्धाने तिच्या तमाम चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

हेही वाचा : २१ वर्षांनी पुन्हा ‘इश्क विश्क’! शाहिदच्या गाण्यावर प्रसाद जवादे अन् अमृता देशमुखचा जबरदस्त डान्स, सर्वत्र होतंय कौतुक

श्रद्धाने शेअर केलेल्या सेल्फी फोटोमध्ये हे दोघेही कॅमेराकडे बघून स्माइल देत असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, अभिनेत्रीने या फोटोला काहीसं हटके कॅप्शन दिलं आहे. “दिल रख ले, नींद तो वापस दे दे यार” असं लिहित यापुढे श्रद्धाने हसण्याचे इमोजी जोडले आहेत. याशिवाय राहुलला तिने या पोस्टमध्ये टॅग सुद्धा केलं आहे. हा फोटो पाहिल्यावर श्रद्धाने प्रेमाची जाहीर कबुली देत त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

श्रद्धाने हा सेल्फी फोटो शेअर करत याला “नींद चुराई मेरी किसने ओ सनम…” हे गाणं देखील लावलं आहे. राहुलच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर IMDb नुसार, राहुल मोदी ‘प्यार का पंचनामा २’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘तू झुठी में मक्कार’ या चित्रपटांचा लेखक आहे. तसेच तो सहायक दिग्दर्शक म्हणून देखील काम करतो.

हेही वाचा : “गृहमंत्री महोदय राजीनामा द्या, सोडा खुर्ची…”, वसईत तरुणीची भररस्त्यात हत्या, किरण माने संताप व्यक्त करत म्हणाले…

श्रद्धा कपूरची पोस्ट चर्चेत

दरम्यान, श्रद्धा कपूर आता लवकरच ‘स्त्री २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या १५ ऑगस्टला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये श्रद्धा कपूरसह राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असतील.