mahesh manjrekar will not direct randeep hooda starrer swatantryaveer savarkar biopic | स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकबद्दल मोठी अपडेट; महेश मांजरेकर दिग्दर्शकाच्या भूमिकेतून बाहेर | Loksatta

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकबद्दल मोठी अपडेट; महेश मांजरेकर दिग्दर्शकाच्या भूमिकेतून बाहेर

महेश मांजरेकर यांच्याऐवजी हा अभिनेता या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकबद्दल मोठी अपडेट; महेश मांजरेकर दिग्दर्शकाच्या भूमिकेतून बाहेर
स्वातंत्र्यवीर सावरकर बायोपिक महेश मांजरेकर | Swatantra-Veer-Savarkar mahesh manjrekar

अभिनेता रणदीप हुड्डा बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. चित्रपट अथवा कोणतीही भूमिका रणदीप हुड्डा नेहमीच त्यासाठी बरीच मेहनत घेताना दिसतो आणि हे त्याच्या चित्रपटांमध्ये दिसून येतं. गेतो ल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो चित्रपट म्हणजे महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘स्वातंत्रवीर सावरकर’. या चित्रपटात तो सावरकरांची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि त्यासाठी जोरदार तयारी करत आहे. मध्यंतरी या भूमिकेसाठी त्याने जे ट्रान्सफॉर्मेशल केलं त्याचीसुद्धा चांगलीच चर्चा झाली होती.

आता मात्र या चित्रपटाविषयी एक वेगळीच बातमी समोर येत आहे. एका मीडिया रीपोर्टनुसार या चित्रपटातून दिग्दर्शक महेश मांजरेकर बाहेर पडले आहेत. दिग्दर्शक महेश मांजरेकर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते. पण आता ते या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार नसून ती जवाबदारीदेखील अभिनेता रणदीप हुड्डा याच्यावर आलेली आहे. चित्रपटाचं चित्रीकरण पुढील आठवड्यात सुरू होणार होते आणि ऐनवेळी महेश मांजरेकर यातून बाहेर पडल्याने चित्रपटाच्या चित्रीकरणावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

अजूनतरी महेश मांजरेकर यांचं या चित्रपटाच्या बाहेर पडण्यामागचं कारण समोर आलेलं नसून रणदीपनेदेखील याबद्दल कुठेच भाष्य केलेलं नाही. चित्रपटाच्या विषयाला होणारा विरोधामुळे मांजरेकर यातून बाहेर पडले आहेत की यामागे आणखी काही तांत्रिक कारणं आहे ते खुद्द महेश मांजरेकरच सांगू शकतील. पण सध्या तरी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रणदीपकडे असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा : ब्रह्मास्त्रच्या बजेटवर शंका उपस्थित करणाऱ्यांना रणबीर कपूरने दिलं चोख उत्तर; मांडून दाखवला हिशोब

याचवर्षी म्हणजे २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या दिवशी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या पोस्टरची खूप चर्चा झाली, रणदीपच्या लूकची प्रेक्षकांनी खूप प्रशंसा केली. रणदीपनेही याविषयी सोशल मीडियावर पोस्ट करून याबद्दल आनंद व्यक्त केला होता. या भूमिकेसाठी रणदीपने नुकतंच तब्बल २५ किलो वजनदेखील कमी केल्याची चर्चा झाली होती. रणदीपच्या या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. याबरोबरच महेश मांजरेकर हे बिग बॉसच्या तयारीत व्यस्त आहेत आणि ते आगामी ‘गोडसे’ या चित्रपटावरसुद्धा काम करत आहे. तूर्तास त्याविषयी नवीन माहिती अजूनतरी समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-09-2022 at 11:58 IST
Next Story
मुस्लीम आई, दोन लग्न, परवीन बाबीशी अफेअर अन् स्वतःच्याच मुलीबरोबर…; महेश भट्ट यांच्या आयुष्यातील वादग्रस्त किस्से