रणवीर सिंगचे आज लाखो चाहते आहेत. कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळीही त्याच्यावर भरभरून प्रेम करतात. नुकतंच त्याचं ‘सर्कस’ चित्रपटामधील ‘करंट लगा रे’ गाणं प्रदर्शित झालं. या गाण्यामध्ये तो पत्नी व अभिनेत्री दीपिका पदुकोणबरोबर डान्स करताना दिसत आहेत. रणवीर-दीपिकाच्या या गाण्याला प्रेक्षकांसह कलाकार मंडळीही प्रचंड प्रतिसाद देताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – अभिनेत्रीच्या पायाला किस केल्यानंतर आता दुसरीच्या कमरेत हात टाकून राम गोपाल वर्मांचं फोटोशूट, फोटो शेअर करत म्हणाले…

‘सर्कस’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये काम करणाऱ्या सिद्धार्थ जाधवने रणवीरच्या या गाण्यावर कमेंट केली. “दादा व वहिनीचे जलवे. कडक. फुल राडा.” अशी कमेंट सिद्धार्थने केली. त्यानंतर अभिनेत्री अभिज्ञा भावेलाही कमेंट करण्याचा मोह आवरला नाही.

अभिज्ञाने खास इमोजी शेअर करत रणवीर-दीपिकाच्या गाण्यावर कमेंट केली. त्यानंतर रणवीरने तिची ही कमेंट लाईक केली. हे पाहून अभिज्ञाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने याबाबत इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली.

अभिज्ञाने रणवीरने लाईक केलेल्या कमेंटचा फोटो शेअर करत म्हटलं की, “म्हणूनच मी त्याच्यावर प्रेम करते.” अभिज्ञाची ही पोस्ट पाहून ती रणवीरची खूप मोठी चाहती आहे हे लक्षात येतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh deepika padukone cirkus movie song current laga re abhidnya bhave comment on actor see details kmd