Mumbai Breaking News Updates Today 15 May 2025 : हवामान विभागाने मुंबईसह ठाणे पालघर भागात आज सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे. काही भागात आज दिवसभरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. याचबरोबर सायंकाळपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार ते बुधवार या कालावधीत शहर, तसेच उपनगरातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या घडामोडी तसेच मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Live Updates, 15 May 2025

12:34 (IST) 15 May 2025

गणेश नाईक – कथोरे सूर जुळले ? मुरबाडच्या वन विभागातील समस्यांवर नाईकांचा तात्काळ तोडगा

आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नाईक यांनी ‘आस्थेने’ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेला हा ‘सज्जड दम’ दोन्ही नेत्यांतील नव्या सौहार्दाची ‘नांदी’ असल्याचे बोलले जाते आहे. …सविस्तर बातमी
11:39 (IST) 15 May 2025

राष्ट्रीय सुरक्षा की फक्त भाजपची प्रचारवल्गना?

भाजपच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा हा मुद्दा ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा भाग बनला आहे. प्रत्येक निवडणुकीआधी एखादी राष्ट्रीय आपत्ती किंवा कारवाई राजकीय संधी म्हणून वापरली जाते. हीच भाजपची नवी रणनीती आहे, असा दावा करणारा आणि ‘राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचे महत्त्व’ या ‘पहिली बाजू’चा (लोकसत्ता- १४ मे) प्रतिवाद करणारा लेख… …अधिक वाचा
10:34 (IST) 15 May 2025

मुंबईत सतर्कतेचा इशारा… राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट…

हवामान विभागाने मुंबईसह ठाणे पालघर भागात आज सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे. काही भागात आज दिवसभरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. याचबरोबर सायंकाळपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…

10:33 (IST) 15 May 2025

बेकायदेशीर घोडागाडी वापराप्रकरणी गुन्हा दाखल

कुलाबा परिसरात बेकायदेशीररित्या घोडागाडी चालविल्याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राणी हक्कांसाठी कार्यरत असलेल्या पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स (पेटा) इंडिया या संस्थेने हा गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा…

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे