-
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५७.७९ टक्के मतदान झालं.
-
६२३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून या टप्प्यात मतदानासाठी पात्र असलेल्यांची संख्या २ कोटींच्या आसपास आहे.
-
या मतदारांची आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
-
त्यासोबतच आत्ताच्या परिस्थितीची आणि आपल्या समस्यांची जाणीवही लोकप्रतिनिधींना करून दिली आहे.
-
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना, जेवरमधील रहिवासी लक्ष्मी गोसावी म्हणाल्या की, खासगी शाळेत मुलांना शिक्षण देणं प्रचंड महाग आहे. पण सरकारी शाळा म्हणाव्या तितक्या चांगल्याा नाहीत. माझे पती दुकानात मजूर म्हणून काम करतात, त्यामुळे त्यांचा पगार मर्यादित आहे.
-
पहिल्यांदाच मतदान करणारी १९ वर्षीय शुभांगी सध्या दिल्ली विद्यापीठाच्या दयाल सिंग महाविद्यालयात शिकत आहे. ‘मी त्या पक्षाच्या बाजूने मतदान केले जे आम्हाला आश्वासने न देता नोकऱ्या देऊ शकतात, पूर्ण पानाच्या जाहिरातीऐवजी स्थिर अर्थव्यवस्था देऊ शकतात आणि जात, धर्म आणि समुदायाची पर्वा न करता सर्वांना न्याय देऊ शकतात,’ ती म्हणाली.
-
नोएडाच्या सेक्टर 71 मधील गृहिणी आणि रहिवासी विजय कुमारी म्हणाल्या की गेल्या पाच वर्षांत नोकरीची सुरक्षा सुधारली आहे.
-
राजकिया महाविद्यालयाची विद्यार्थिनी शिवानी शर्मा म्हणाली की मतदान करताना आरोग्य आणि महिला सुरक्षा हे मुख्य मुद्दे तिच्या मनात होते.
-
दादरी इथल्या मतदान केंद्रावर १०० वर्षीय आजीनींही आपला मतदानाचा हक्क बजावला.
-
सर्व फोटोंचं सौजन्य – इंडियन एक्सप्रेस

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल