-
टाईम्स ऑफ इंडियाने घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंबाबत नवे खुलासे केले आहेत.काय म्हणाले आहेत एकनाथ शिंदे? जाणून घेऊयात.
-
उद्धव ठाकरे आणि तुमच्यात कोणत्या मुद्द्यावरून ठिणगी पडली असा प्रश्न त्यांना विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, “मला वर्षा बंगल्यावर बोलावलं गेलं आणि अनेक तास वाट पाहायला लावली. हे जवळपास दोन वर्ष सुरू होतं.” (सर्व फोटो साभार- एकनाथ शिंदे फेसबुक पेज)
-
“शेवटी, राज्यसभा निवडणुकीवेळी मला यापासून बाहेर ठेवण्यात आलं. माझ्याकडून नगरविकास खातंही काढून घेण्याचा प्रयत्न झाला. मला नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्यानंतरही मला झेड प्लस सुरक्षा दिली गेली नाही.” असे ते म्हणाले. (सर्व फोटो साभार- एकनाथ शिंदे फेसबुक पेज)
-
“मी त्यांना अनेकदा भाजपाबरोबर जाण्याची विनंती केली. या विनंतीला उद्धव ठाकरेंनी होकारही दर्शवला.” (सर्व फोटो साभार- एकनाथ शिंदे फेसबुक पेज)
-
“महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटही घेतली होती. निर्णयासाठी त्यांना आठ दिवसांचा कालावधी दिला गेला. परंतु, याबाबत निर्णय घेण्यापेक्षा त्यांनी भाजपाच्या १२ आमदारांनाच निलंबित केलं.” अस शिंदेंनी सांगितलं. (सर्व फोटो साभार- एकनाथ शिंदे फेसबुक पेज)
-
शिवसेना फूट हा कट नव्हता, बंडखोरी होती
उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली नसताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाठित खंजीर खुपसला असा आरोपही एकनाथ शिंदेंवर केला जातो. यावरही त्यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, “हा कट नव्हता. ही बंडखोरी होती. विधानसभेत राज्यसभेसाठी मतदान सुरू होतं तेव्हा याचं नियोजन आखण्यात आलं. किंबहुना मी सर्व आमदारांना संजय राऊतांना मतदान करण्याचं आवाहन करून सूरतसाठी निघालो. आम्ही संजय राऊतांना हरवू शकत होतो. पण आम्ही तसं केलं नाही. (सर्व फोटो साभार- एकनाथ शिंदे फेसबुक पेज) -
“आम्ही सूरतला पोहोचेपर्यंत आम्हाला खूप कॉल आले. वसईतील एका चहाच्या स्टॉलवरून मी उद्धव ठाकरेंनाही फोन केला. त्यावेळी त्यांनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफरही दिली. पण आता खूप उशीर झाल्याचं मी त्यांना म्हणालो.” (सर्व फोटो साभार- एकनाथ शिंदे फेसबुक पेज)
-
“मी खुलेआमपणे बाहेर पडलो होतो. त्यांनी दिल्लीतही कॉल केला होता. शिवसेना आणि भाजपाची युती होऊ शकते, मग एकनाथ शिंदे कशाला पाहिजेत? असंही ठाकरे भाजपाला म्हणाले. पण त्यावेळी त्यांच्या हातात काहीही उरलेलं नव्हतं”, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. (सर्व फोटो साभार- एकनाथ शिंदे फेसबुक पेज)
-
आता यासगळ्यावर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रीया देतात? यावर लक्ष असणारं आहे.(सर्व फोटो साभार- एकनाथ शिंदे फेसबुक पेज)

बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये जगावर मोठं संकट कोसळणार? AI वरील तर… खतरनाक भाकितं वाचून बसेल धक्का