-
गुजरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात अहमदाबादमधील निशान विद्यालय मतदान केंद्रातून मतदानाचा हक्क बजावला.
-
लोकशाहीच्या या निवडणूक उत्सवात सर्व नागरिकांनी उत्साहाने मतदान करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते.
-
अमित शाह यांनी पत्नी आणि मुलासह नारणपुरा येथे मतदान केले. (फोटो – ANI)
-
तुमच्या एका मतात मोठी ताकद आहे, त्यामुळे तुमच्या मताची ताकद ओळखून नक्कीच मतदान करा आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा, असे ते म्हणाले. मतदानापूर्वी अमित शहा यांनी कामेश्वर महादेव मंदिरात पूजा केली. (Photo- ANI)
-
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी शीलज प्राथमिक शाळेत मतदान करताना सांगितले, “मतदान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि भारताला ‘विश्व गुरु’ बनवण्यासाठी योगदान दिले पाहिजे.” (Photo- ANI)
-
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शिलाज प्राथमिक शाळेत पोहोचून मतदान केले. (Photo- ANI)
-
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी गुजरातमधील नवसारी लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदान केले.
-
केंद्रीय मंत्री आणि पोरबंदरमधील भाजपाचे उमेदवार मनसुख मांडविया आपल्या पत्नीसह मतदानासाठी पोहोचले. ते म्हणाले, “जेव्हा मी मतदान करत होतो, तेव्हा मी फक्त लोकांच्या हिताचा आणि देशासाठी ‘विकसित भारत’च्या नेतृत्वाचा विचार करत होतो. मला आशा आहे की भाजपा ४०० हून अधिक जागांसह सत्तेवर येईल. (Photo- ANI)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी