-
यंदा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए आघाडी अशी थेट लढत पाहताना मिळाली.
-
निवडणुकीचा सबंध प्रचारकाळ दोन्हीकडील नेत्यांनी एकमेकांवर टीका, हल्ले करत गेला असताना, आता देशात शेवटचा एक टप्पा शिल्लक आहे.
-
या ही टप्प्याच्या प्रचारात नेत्यांच्या एकमेकांवर टीका होताना दिसत आहेत.
-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल (२६ मे) रोजी उत्तर प्रदेशातील पूर्वांचल प्रदेशातील घोसी येथे जाहीर सभा होती.
-
या सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
-
एससी, एसटी, ओबीसी यांना दिलेले आरक्षण संपवून ते सर्व मुस्लिमांना दिले जाईल, असा आरोप पंतप्रधानांनी केला.
-
‘इंडिया आघाडी’ला देशातील बहुसंख्य समाजाला द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवायचे आहे आणि धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी राज्यघटनेचे पुनर्लेखन करण्याची योजना त्यांनी आखली आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
-
समाजवादी पक्ष आणि काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की, त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पूर्वांचलकडे दुर्लक्ष केले आहे. माफिया, गरिबी आणि असहायतेचा प्रदेश असे रूपांतर या प्रदेशाचे केले. जनतेचे लक्ष वास्तविक मुद्द्यांपासून वळवण्यासाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस जातींना आपापसांत लढायला लावत आहेत, जेणेकरून समाज कमकुवत होईल, असा आरोप पंतप्रधानांनी केला.
-
(सर्व फोटो नरेंद्र मोदी फेसबुक पेजवरून साभार) हे देखील पहा- लोकसभा झाली, आता विधानसभा निवडणूक कधी? ‘या’ तारखेला संपतेय महाराष्ट्र विधानसभेची मुदत…

India On Trump : “राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी सर्व…”, अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर