-
बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा सर्वेसर्वा राहुल शर्मा मंगळवारी विवाहबंधनात अडकले. नवी दिल्लीतील एका चर्चमध्ये सकाळी ११.३० वाजता दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले.
-
असिनच्या हिंदू पद्धतीच्या लग्नाची साडी ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्ससाची यांनी तयार केली आहे तर ख्रिश्चन पद्धतीचा गाऊन वेरा वॅन्ग यांनी डिझाईन केला आहे.
-
-
मंगळवारी संध्याकाळी मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या सोबतीने लग्नसोहळा पार पडला. यावेळी असिनचा ‘बेस्ट मॅन’ आणि राहुलचा जीवश्च मित्र अक्षयकुमारही उपस्थित होता.
-
सकाळी ख्रिश्चन पद्धतीने दोघांचा विवाह झाला. जवळपास शंभर पाहुणे असिन-राहुलच्या या खास क्षणांचे साक्षीदार झाले. त्यानंतर नवी दिल्लीतील दुसित देवराना रिसॉर्टमध्ये हिंदू पद्धतीने संध्याकाळी लग्न पार पडले.
-
लग्नात संपूर्णपणे शाकाहारी मेन्यू ठेवण्यात आला होता. यावेळी दहा थरांचा व्हॅनिला केकही नवदाम्पत्यासाठी मागवण्यात आल्याचं ‘हिंदुस्तान टाइम्स’ने म्हटले आहे.
यावेळी हॉटेलबाहेर असिन आणि राहुल यांचे नातेवाईक उपस्थित होते. -
दिल्लीतील विवाहसोहळा फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईकांसाठी होता. मात्र २३ जानेवारी रोजी मुंबईत बॉलिवूडमधील तारेतारकांसाठी रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.
-
-
सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीत असिन आणि राहुलने एकत्र एन्ट्री केली होती, तेव्हापासूनच त्यांच्या लग्नाची चर्चा जोरात होती.
-
-
-
-
-
-
'गजनी' या चित्रपटातून असिनने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
-
-
-
-
-
-
-

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल