-
'सुलतान' चित्रपटातील अनुष्का शर्मा कुस्ती करतानाच्या दृष्याची पहिली झलक प्रसिद्ध झाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी आपल्या टि्वटर खात्यावर हे छायाचित्र प्रसिद्ध केलं आहे. अनुष्का धोबी पछाड करण्यात माहीर असल्याचेदेखील त्यांनी म्हटलं आहे. (source-twitter)
-
अली यांनी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रात अनुष्का कुस्ती करताना नजरेस पडते. 'हरियाणाची वाघीण, धोबी पछाड मास्टर', अशा ओळी त्यांनी छायाचित्रासोबत लिहिल्या आहेत.
-
'धोबी पछाड इन अॅक्शन' असा संदेश लिहित अनुष्कानंदेखील हे छायाचित्र रिटि्वट केलं.
-
चित्रपटात कुस्तीपटूची भूमिका साकारण्यासाठी अनुष्काने सहा आठवड्यांचं कठोर प्रशिक्षण घेतलं. सुलतान चित्रपटात अनुष्काबरोबर सलमान खानदेखील नजरेस पडेल.
-
मोठ्या पडद्यावर अनुष्का एखाद्या सराईत कुस्तीपटूसारखी दिसावी यासाठी तिने कुस्तीचे प्राथमिक डाव-पेच शिकले. आपण असं काही करू यावर विश्वास नसल्याचं तिने दोन महिन्यांपूर्वी एका पोस्टला दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं.
-
कुस्तीगीराच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सलमान खान प्रमुख भूमिका साकारत आहे.
-
यश राज बॅनरखाली बनत असलेला हा चित्रपट ८ जुलै रोजी प्रदर्शित होईल.

IND vs ENG: याला म्हणतात खेळभावना! वोक्सची दुखापत पाहताच करूण-सुंदरने…; दोघांनीही जिंकली सर्वांची मनं; VIDEO व्हायरल