-
ओम पुरी. अभिनय क्षेत्रातील एक दिग्गज कलाकार म्हणून नावारुपास आलेल्या ओम पुरी यांनी आजवर त्यांच्या चित्रपटांतून अभिनयाचा दर्जेदार नमुना सादर केला. (छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
त्यांचा आवाज, संवादकौशल्य आणि कलासृष्टीत असलेला त्यांचा दबदबा काही वेगळाच होता. (छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
ओम पुरी यांच्या निधनाने संपूर्ण कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. सध्या विविध क्षेत्रांतून त्यांना श्रद्धांजली दिली जात आहे. (छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
सशक्त अभिनयाची देणगी लाभलेला कलासक्त अभिनेता म्हणून नावाजलेल्या ओम पुरी यांची काही दुर्मिळ छायाचित्रे… (छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
मुख्यधारेतील चित्रपट असो किंवा समांतर चित्रपट, ओम पुरी यांनी दोन्ही ठिकाणी आपली अमीट छाप उमटवली. (छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
हिंदीसोबतच कन्नड, मराठी, मल्ल्याळम, पंजाबी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये ओम पुरी यांनी अभिनय केला. (छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
१९७२ पासून अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या ओम पुरी यांनी अनेक दर्जेदार भूमिका केल्या आहेत. (छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
गोविंद निहलानी यांच्या १९८० मध्ये प्रदर्शित आक्रोशमधील भूमिका प्रेक्षकांच्या दिर्घकाळ स्मरणात राहील. या चित्रपटात ओम पुरी यांनी अमरिश पुरी आणि नसरुद्दीन शाह यांच्यासारख्या दिग्गजांसोबत अभिनय केला होता. (छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
मानवी भावभावनांचे उत्तम चित्रण असणाऱ्या या चित्रपटाचा समावेश चित्रपट सृष्टीला आकार देणाऱ्या पहिल्या ६० चित्रपटांमध्ये होतो. (छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
१९८३ मध्ये आलेला गोविंद निहलानी यांच्या अर्धसत्य चित्रपटात ओम पुरी यांच्या सशक्त अभिनयाची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली. (छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
आपल्या कर्तव्यात कमी पडलेला मात्र प्रामाणिक असलेला पोलीस अधिकारी ओम पुरी यांनी साकारला होता. (छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
जाने भी दो यारो हा व्यंगात्मक विनोदी चित्रपट १९८३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. (छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
प्रशासन, राजकारण, व्यवसाय यांच्यामधील भ्रष्टाचार यावर जाने भी दो यारोमधून भाष्य करण्यात आले होते. (छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
ओम पुरी यांनी या चित्रपटात अहुजा नावाच्या एका भ्रष्ट व्यक्तीची भूमिका साकारली होती. ब्लॅक कॉमेडी प्रकारातील हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला. समीक्षकांनीदेखील या चित्रपटाचे कौतुक केले. (छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
(छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
(छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
(छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
(छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
(छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
(छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
(छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)
-
(छाया सौजन्य- एक्सप्रेस अर्काईव्हज)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल