-
टेलिव्हिजन विश्वात सध्याच्या घडीला बरेच कार्यक्रम चर्चेत आहेत. त्यापैकीच एक कार्यक्रम म्हणजे 'द ड्रामा कंपनी'. सुगंधा मिश्रा, ऋत्विक धनजानी, अली असगर या कलाकारांची विनोदी फटकेबाजी या कार्यक्रमातून पाहायला मिळते. त्यांच्या विनोदांसोबच कार्यक्रमात साथ असते ती म्हणजे विविध सेलिब्रिटींची.
-
या 'ड्रामेबाजां'च्या विनोदांचा आनंद घेण्यासाठी या मंचावर नुकतीच भारतीय हॉकी संघातील काही खेळाडूंनी हजेरी लावली होती.
-
आकाश चिकटे, एस.व्ही.सुनील, गुरजंत सिंह, मनप्रीत सिंह, हरमनप्रीत सिंह या खेळाडूंनी विनोदाच्या या मंचावर हजेरी लावली होती. यासोबतच अभिनेता राजकुमार रावचीही या कार्यक्रमात उपस्थिती होती.
-
यावेळी उपस्थितांनी ड्रामा कंपनीच्या कलाकारांसोबत एकच कल्ला केल्याचेही पाहायला मिळाले. कलाकारांच्या विनोदी खेळीचा या हॉकीपटूंनी मनमुराद आनंद लुटला.
-
अभिनेता ऋत्विक धनजानीने खेळाडूंना बोलतं करण्याची जबाबदारी घेतली असून, त्याने ही जबाबदारी लिलया पेलली होती.
-
विनोदाच्या या मंचावर खेळाडूंनी भांगडा नृत्यावरही ठेका धरल्याचे पाहायला मिळाले.

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल