
'बिग बॉस १४' हा रिअॅलिटी शो सध्या फार चर्चेत आहे. शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. यासाठी प्रत्येक स्पर्धकाला किती मानधन मिळतं, हे तुम्हाला माहितीये का? 'बिग बॉस १४'मधील कोणत्या स्पर्धकाला सर्वांत कमी आणि कोणाला सर्वाधिक मानधन मिळतं ते जाणून घेऊयात.. -
'द खबरी'ने दिलेल्या वृत्तानुसार, शहनाज देओलला दर आठवड्यासाठी ५० हजार रुपये मानधन मिळतं. बिग बॉसच्या घरात सर्वांत कमी मानधन शहनाजला मिळतंय.

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू याला दर आठवड्याला ८० हजार रुपये मिळतात. 
'इंडियन आयडॉल'मधून नावारुपास आलेल्या राहुल वैद्यला दर आठवड्याला एक लाख रुपये मिळतात. 
बिग बॉसच्या घरात सर्वाधिक चर्चेत असलेल्या निक्की तांबोळीला १.२ लाख रुपये मिळतात. 
पवित्रा पुनिया- १.५ लाख रुपये 
अभिनेता अभिनव शुक्लाला दर आठवड्याला १.५ लाख रुपये मानधन मिळतं. 
एजाज खान- १.८ लाख रुपये 
निशांत सिंह मलकानीला २ लाख रुपये 
सारा गुरपालला दोन लाख रुपये 
जास्मिन भसिनला तीन लाख रुपये मिळतात. 
तर बिग बॉसच्या घरात सर्वाधिक मानधन अभिनेत्री रुबिना दिलैकला मिळतंय. दर आठवड्याला तिला पाच लाख रुपये मानधन मिळतंय. 
यंदाच्या सिझनमध्ये मागील सिझनमधील काही स्पर्धकसुद्धा सहभागी झाले आहेत. त्यापैकी सिद्धार्थ शुक्लाला ३२ लाख रुपये दर आठवड्याला मिळत आहेत. 
हिना खानला २५ लाख रुपये मिळत आहेत. 
गौहर खानला २० लाख रुपये मानधन मिळतंय.
दोन दोन दिवस पोट साफ होत नाही? रात्री फक्त ‘या’ पानांचं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ