-
बिग बॉस १३ फेम अभिनेत्री शहनाझ गिल नुकतीच मुंबईमध्ये एका चित्रीकरणासाठी गेली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा टॉप आणि काळा-गुलाबी रंगाचा फ्रिल्स असलेला स्कर्ट घातला आहे. तिने केस हाय पोनीटेलमध्ये बांधले आहेत. तिचा हा लूक पाहून ती जणू बार्बी डॉल असल्यासारखं वाटत आहे. (फोटो सौजन्यः वरिंदर चावला)
-
शहनाझ गिलला तिचे चाहते प्रेमाने 'पंजाबची कतरिना कैफ' म्हणत असतात. तिच्या या लूकमध्ये ती खरंच अजब प्रेम की गजब कहानी चित्रपटातल्या कतरिनासारखी दिसत आहे. (फोटो सौजन्यः वरिंदर चावला)
-
तिने फोटोग्राफर्सकडे पाहत हात हलवत छान पोझही दिली आहे. (फोटो सौजन्यः वरिंदर चावला)
-
तिच्या बबली स्वभावाबद्दल सर्वांनाच माहित आहे. तिचं असंच तिच्या स्वभावाला साजेसं हास्य फोटोग्राफर्सनी टिपलं आहे. (फोटो सौजन्यः वरिंदर चावला)
-
तिने नुकतंच बरंच वजन घटवलं आहे. यासाठी तिने आपण नियंत्रित आहार घेतल्याचंही सांगितलं आहे. (फोटो सौजन्यः वरिंदर चावला)
-
शहनाझने नुकताच हेअरकट केला आहे. त्याचे फोटोजही तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. (फोटो सौजन्यः शहनाझ गिल इन्स्टाग्राम)
-
शहनाझचा एक कॅन्डिड फोटो (फोटो सौजन्यः वरिंदर चावला)
-
शहनाझ नुकतीच तिच्या चित्रपटाच्या चित्रीकऱणासाठी कॅनडाला गेली होती. ती दिलजीत दोसांजसोबत लवकरच हौसला रख या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्यः वरिंदर चावला)
-
गेल्या वर्षी ती गायक बादशाहसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली होती. तिने अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतही दोन म्युझिक व्हिडिओजमध्ये काम केलं आहे. (फोटो सौजन्यः वरिंदर चावला)

‘अहा.. काय गोड नाचली राव…’, चिमुकलीचे एक्सप्रेशन अन् डान्स पाहून नेटकरी करतायत कौतुक; पाहा VIDEO