-
बॉलिवूडमध्ये 70 ते 90 या तीन दशकांत अभिनेत्रे एके हंगलं यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. हंगल यांनी मात्र त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात वयाच्या पन्नासाव्या वर्षी केली. बासू भट्टाचार्या यांच्या 'तिसरी कसम' या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
-
एके हंगलं यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत एकूण 16 सिनेमांमध्ये काम केलंय. तसचं अनेक बड्या कलाकारांसोबत त्यांनी स्क्रीन शेअर केलीय.
-
शौकीन, आइना, तपस्या, हीर रांझा, नमक हराम, कोरा कागज अशा अनेक लोकप्रिय सिनेमांमधून त्यांनी अभिनयाची जादू दाखवली आहे. 2006 सालात एके हंगल यांना सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
-
एके हंगल यांनी विविध सिनेमांमधून वडील, काका, आजोबा, नोकर अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांची कायम पसंती मिळतं.
-
शोले सिनेमातील रहिम चाचाची भूमिका साकारलेल्या एके हंगल याचं पूर्ण नाव अवतार किशन हंगल असं होतं. पाकिस्तानमधील पेशावरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. सिनेसृष्टीत येण्याआधी त्यांनी १९२९ ते १९४७ या काळात स्वातंत्र्य लढात सहभाग घेतला होता. मार्स्कवादी असल्याने पाकिस्तानमधील जैलमध्ये त्यांना तीन वर्ष कैद करण्यात आलं होतं.
-
१९४९ सालात जेलमधून सुटल्यानंतर ते संपूर्ण कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाले. पेशावर मध्ये असताना ते नाटकांमध्ये काम करायचे. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सिनेसृष्टीत नशीब आजमवण्यास सुरूवात केली.
-
असं म्हंटलं जातं कि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळा साहेब ठाकरे यांनी १९९३ सालात हंगल यांच्या सिनेमावर बंदी घातली होती. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात हंगल उपस्थिती राहिल्याने बाळासाहेब ठाकरे नाराज होते.
-
अनेक सिनेमांमध्ये काम करूनही हंगल यांना उतारवयात खडतर परिस्थितीचा सामना करावा लागला.
-
95 व्या वर्षी ते आपल्या मुलासोबत अत्यंत बिकट परिस्थितीत राहत होते. एक वेळ अशी आली की हंगल यांच्याकडे उपचारासाठी आणि औषधांसाठी देखील पैसे नव्हते.
-
त्यानंतर बाथरूममध्ये पाय घसरल्याने त्यांच्या मांडीला आणि पाठीला मोठी दुखावत झाली. सर्जरीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सर्जरी करणं शक्य नव्हत. या अपघातानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. २६ ऑगस्ट २०१२ साली वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (all photo- archive/indian express)

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची अरेरावी सुरूच! भारताला धमकी देत म्हणाले, “प्रत्युत्तर दिले तर…”