-
'1942- लव स्टोरी', 'बॉम्बे', 'दिल', अशा सिनेमांमधून बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोइरालाने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली होती. ९० च्या दशकात मनीषा कोइरालाने बॉलिवूडमध्ये तिची छाप पाडली होती. मनीषाच्या फिल्मी करिअरममध्ये अनेक चढउतार आले.
-
मनीषा कोइराला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नुकताच मनीषाने सोशल मीडियावर तिच्या पहिल्या फोटोशूटचा एक फोटो शेअर केला आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट या फोटोत मनीषाचा अंदाज खूपच वेगळा दिसतोय. अगदी लहान केस आणि तारुण्यातील निरागसता तिच्या चेहऱ्यावर झळकतेय. "थ्रोबॅक माझं पहिलं फोटोशूट" असं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय.
-
मनीषा कोइरालाच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच दिया मिर्झा, श्रुति. आयुष्यमान खुराना, तब्बू, श्रुती हसन, मौनी रॉय अशा अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.
-
मनीषाला तिच्या 'सौदागर' या पहिल्या सिनेमात दिलीप कुमार आणि राजकुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. मनीषाने हिंदीसोबतच तेलगू, नेपाळी आणि तामिळ सिनेमांमध्येही काम केलंय.
-
मनीषा कोइरालाने अनोखा अंदाज, गुड्डू, राम शास्त्र, अकेले हम अकेले तुम,मन, सनम, खामोशी, गुप्त, कच्चे धागे, संजू या सिनेमांमधून तिच्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे.
-
२०१० सालामध्ये मनीषाने नेपाळी उद्योगपती सम्राट दहलसोबत लग्नगाठ बांधली. मात्र दोन वर्षातच ते विभक्त झाले.
-
२०१२ सालामध्ये मनीषाला गर्भाशयाच्या कॅन्सरने ग्रासल. न्यूयॉर्कमध्ये तिने कॅन्सरवर पुढील उपचार घेतले. तर २०१५ सालात ती कॅन्समधून पूर्णपणे बरी झाली. (all photo-instagram@m_koirala)

हार्ट अटॅक येणार असेल तर बरोबर एक महिना आधीच कळतं; या दोन लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जगायचं असेल तर जाणून घ्या