-
अभिनेता कार्तिक आर्यनने अगदी कमी काळातच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कार्तिकच्या लूकवर आणि त्याच्या डॅशिंग अंदाजावर तर लाखो तरुणी फिदा आहेत. सोशल मीडियावर देखील कार्तिकचे असंख्य चाहते आहेत. आजवर कार्तिकने अनेक बड्या ब्रॅण्डसोबत हातमिळवणी करत जाहिराती केल्या आहेत. एवढचं नाही तर कार्तिकला आलिशान गाड्यांची आवड असून त्याच्याकडे काही आलिशान गाड्यादेखील आहेत. आज आपण कार्तिक आर्यनची कमाई आणि अनेक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.
-
एका रिपोर्टनुसार कार्तिक आर्यनचं एका वर्षाचं उत्पन्न साधारण ३६ कोटी इतकं आहे. या अहवालानुसार कार्तिक एका सिनेमातून साधारण ५ ते ६ कोटी रुपये कमावतो.
-
याशिवाय कार्तिक आर्यन अनेक बड्या ब्रॅण्डसच्या जाहिराती करतो. यात बोट, अप्पो, फेअर अॅण्ड हॅण्डसम, इमामी अशा अनेक जाहिरातींचा समावेश आहे.
-
मुंबईतील वर्सोवा परिसरात कार्तिक आर्यनचा स्वत:चा फ्लॅट आहे. सोशल मीडियावरील कार्तिकच्या काही फोटोत आणि व्हिडीओमध्ये त्याचं घर पाहायला मिळतं.
-
कार्तिकला महागड्या गाड्याची आवड आहे. २०१७ सालात त्याने बीएमडब्लू गाडी खरेदी केली होती. एवढचं नाही तर आईच्या आवडीची मिनी कूपर कार कार्तिकने आईला भेट म्हणून दिली आहे. तर या वर्षी कार्तिकने लेम्बोर्गिनीही लक्झरी कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत तब्बल साडे चार कोटी इतकी आहे.
-
2019 सालात फोर्ब इंडियाने घोषित केलेल्या १०० लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत कार्तिक ६७व्या स्थानावर होता.
-
इन्स्टाग्रामवर कार्तिक आर्यनचे २१ मिलियनहून अधिक फॉलेवर्स आहेत.
-
तर येत्या काळात कार्तिक अनेक प्रोजेक्टवर काम करतोय.
-
कार्तिक आर्यन लवकरच 'धमाका' आणि 'भुलभुलैया' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
तर कार्तिकच्या एका नव्या सिनेमाची घोषणा नुकतीच करण्यात आलीय. मराठमोळे दिग्दर्शक समीर विद्धवंस यांच्या 'सत्यनारायण की कथा' या सिनेमात तो मुख्य भूमिका साकारणार आहे. (All Photo-Instagram@kartikaaryan)

चाळिशीनंतर रात्रीचे जेवण टाळावे का? दिवसातून एकदा जेवणे अन् रात्रीचा उपवास करण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात…..