-
टेलिव्हिजनवर साध्या, भोळ्या भाबड्या मुलीची किंवा सुनेची भूमिका साकारणाऱ्या अनेक अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र चांगल्याच बोल्ड आणि ग्लॅमरस आहेत. मालिका आणि विविध शोमधून आपल्या भेटीला येणाऱ्या या अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील चांगल्याच सक्रिय असून बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे त्या अनेकदा चर्चेत असतात. गेल्या काही दिवसात अशाच काही अभिनेत्रींनी त्यांच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या बोल्ड फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
-
रश्मी सोशल मीडियावर अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने काळ्या रंगाच्या बिकिनीतील फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
-
तर नुकतेच रश्मीने बाधरूममधील काही काही फोटो शेअर केले आहेत. यात रश्मी शॉवरखाली उभी असल्याचं दिसतंय. रश्मीच्या मादक फोटोंना अनेक चाहत्यांनी पसंती दिलीय.
-
आपल्या बोल्ड लूकसोबतच बोल्ड वक्तव्यांमुळे कामय चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे निया शर्मा.
-
निया सोशल मीडियावर कायमच बोल्ड आणि मादक फोटो शेअर करत असते.
-
नुकतेच नियाने एक काळ्या रंगाच्या बॅकलेस टॉपमधील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. यामुळे नियाला ट्रोल करण्यात आलं होतं. तर एक बोल्ड व्हिडीओ शेअर करतच नियाने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं होतं.
-
'बिग बॉस १४' ती विजेती अभिनेत्री रुबिना दिलेक शोमध्ये जिकंल्यानंतर अधिकच चर्चेत आली आहे.
-
शोनंतर रुबीना सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतेच रुबिनाने काळ्या रंगाच्या एका बोल्ड स्विम सूटमधील फोटो शेअर केले आहेत.
-
'बिग बॉस १३'मधून अनेकांची पसंती मिळवलेली शेहनाज गिल तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
शहनाजने नुकतच बॉलिवूड फोटोग्राफर डब्बू रतनानीसाठी फोटोशूट केलं होतं. यात शहनाजचा हटके अंदाज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.
-
सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत अभिनेत्री श्वेता तिवारी चांगलीच चर्चेत असते.
-
वजन कमी केल्यानंतर श्वेता तिवारीने शेअर केलेले ग्लॅमरस फोटो अनेकांच्या चर्चेचे विषय होता.
-
तर अभिनेत्री टिना दत्ता सध्या मालिका विश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय आहे.
-
बोल्ड फोटोंमुळे टिना दत्ता अनेकदा चर्चेत आलीय. तर काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या टॉपलेस फोटोंमुळे टिनाला ट्रोल देखील व्हावं लागलं होतं.
-
तसचं मालदीवमधील बोल्ड फोटो शेअर केल्यानंतरही टिना चर्चेत आली होती.
-
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत एका आदर्श सुनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर सक्रिय आहे.
-
हिना सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.
-
मालदीव ट्रीपला गेलेल्या हिनाने इन्स्टाग्रामवर काही बिकिनीतले फोटो शेअर केले होते. या फोटोंमुळे तिला धर्मावरून अनेकांनी ट्रोल केलं होतं.
-
अभिनेत्री जेनिफर विंगेट तिच्या सौंदर्याने कायमच चाहत्यांना घायाळ करत असते.
-
जेनिफराचा ग्लॅमरस अंदाज नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेतो.
-
‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री शिखा सिंगने गेल्यावर्षी मुलीला जन्म दिल्यानंतर मालिकेतून ब्रेक घेतला आहे. असं असलं तरी शिखा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. शिखाने एक न्यूड फोटो शेअर केल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं (All Photos-Instagram)

“निलेश साबळेसाठी देवाकडे प्रार्थना करतो”, भाऊ कदम यांचं भावनिक विधान; म्हणाले, “त्याची काळजी…”