-
'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.
-
रुपाली तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वेगवेगळ्या लूकमधील फोटो तसचं फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत असते.
-
नुकतच रुपालीने एक खास फोटोशूट केलं असून या हटके लूकमधले फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रुपालीने मार्डन टच असलेलं एक परकर पोलकं परिधान केल्याचं दिसतंय.
-
रुपालीने पिवळ्या रंगाचं प्लिटस् असलेलं परकर परिधान केलंय.
-
यावर तिने आबोली रंगाची चोळी परिधान केली आहे.
-
या चोळीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय.
-
या चोळीच्या बाह्यांना देखील प्लिटस् आहेत. तसचं चोळीच्या मागील बाजूस एक सुंदर चित्र पाहायला मिळतंय.
-
चोळीवरील डिझाइन ही हाताने काढलेली असल्याचं रुपालीने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.
-
या मॉर्डन परकर पोलक्यावर रुपालीने नथ घातली आहे. तसचं तिने घातलेले खास दागिने या लूकची शोभा वाढवत आहेत.
-
अगदी साधा मेकअप करूनही रुपाली या फोटोत सुंदर दिसतेय.
-
रुपालीचा हा लूक येत्या सणांच्या दिवसांसाठी परफेटक्ट असा मॉर्डन टच असलेला पारंपरिक लूक असल्याचं म्हणता येईल. (All Photo-Instagram@rupalibhosle)

Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर