-
‘मनी हाइस्ट’ ही स्पॅनिश वेब सीरिज सध्या बरीच चर्चेत आहे. या वेब सीरिजने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकताच या सीरिजचा पाचवा आणि शेवटचा सिझन प्रदर्शित झाला आहे. यामधील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. यातील टोकियोची भूमिका साकारणारी उर्सुला कॉर्बेरो तिच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. टोकियो म्हणजेच उर्सुला खऱ्या आयुष्यात देखील तितकीच बोल्ड आणि बिनधास्तआहे. पाहुयात तिचे या अंदाजातील काही फोटो.
-
‘मनी हाइस्ट’मध्ये टोकियोचा बिनधास्त, बेधडक, स्वतःचे मतं खरं करणारी दाखवली आहे. त्याच प्रमाणे खऱ्या आयुष्यात देखील उर्सुला स्वतःला ठराविक गोष्टीसाठी मर्यादीत ठेवातं नाही.
-
उर्सुला ही मुळची स्पॅनिश अभिनेत्री आहे. तिने 'मनी हाइस्ट' मध्ये साकारलेल्या टोकियोच्या भूमिकेसाठी तिला भरभरून प्रेम मिळत आहे.
-
.'मनी हाइस्ट'चा पाचव्या सिझनचे पहिले पाच भाग प्रदर्शित झाले असून ते सध्या नेटफ्लिक्सच्या टॉप १० ट्रेंडिंगच्या यादीत सामील झाली आहे.
-
टोकियोची भूमिका साकारणारी उर्सुला ही सीरिजमधील लोकप्रिय पात्रापैकी एक आहे.
-
उर्सुलाचे नुकतेच इन्स्टाग्रामवर २१.५ मिलियन फॉलोवर पेक्षा जास्त फॉलोवर झाले आहेत.
-
उर्सुला लवकरच बॉलिवूडमध्ये काम करणार का अशा चर्चा रंगत होत्या.
-
'मनी हाइस्ट’ बद्दल आणि एकंदरीत भारताबद्दल तिला असलेल्या आपुलकी बद्दल टोकियो म्हणजेच उर्सुलाने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
-
ती त्या मुलाखतीत म्हणाली "मी भारतात कधी आले नाही, मात्र मी भारत पाहण्यासाठी उत्सुक आहे. मला चित्रपटांची नावं लक्षात रहात नसली तरी मी भारतीय चित्रपट पाहिले आहेत."
-
उर्सुलाला ‘स्लम डॉग मिलेनियर’ हा भारतीय चित्रपट प्रचंड आवडला असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितलं.
-
उर्सुलाला जेव्हा बॉलिवूडमध्ये काम करणार का? असा प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली की, “हा, जर माझ्याकडे वेळ असेल तर मी नक्की काम करेन."
-
हिंदी शिकवणारं कोणी असेल तर तिला हिंदी चित्रपटात सुद्धा काम करायला आवडेल. असे ही तिने त्या मुलाखतीत सांगितलं.
-
उर्सुलाला नवीन गोष्टी शिकायला आवडतात. ती त्या गोष्टींकडे आव्हान म्हणून बघते.
-
उर्सुला म्हणजेच ‘मनी हाइस्ट’मधील टोकियोचं हे मतं ऐकून तिच्या फॅन्सना आता उर्सुला कॉर्बेरो बॉलिवूडमध्ये झळकणार का? असा प्रश्न पडला आहे.
-
उर्सुलाने २००२ मध्ये 'मिरल ट्रेंकॅट' या मालिकेतून कलाक्षेत्रात पदार्पण केलं. यात तिने मारियाची भूमिका साकारली होती.
-
उर्सुला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय असते आणि तिने शेअर केलेल्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते.
-
उर्सुलाला लहानपणापासून माहिती होतं की तिला याच क्षेत्रात काम करायचे आहे.
-
उर्सुलाने तिच्या अभिनायची सुरवात जाहिरातीपासून केली.
-
१३ व्या वर्षी तिने अभिनया सोबत जॅझ आणि फलमेनको डान्स फॉर्मचे शिक्षण घ्यायला सुरवात केली.
-
उर्सुला लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
-
हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असली तरी सुरवातीला तिचे इंग्रजी छान नसल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितलं.
-
उर्सुलाला आता पर्यन्त अनेक पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले असून त्यातील अर्ध्या पुरस्कारांची ती मानकरी झाली आहे.
-
उर्सुलाने जेव्हा 'मनी हाइस्ट'ची स्क्रिप्ट वाचली तेव्हा तिला रडू आलं होतं असे तिने एका मुलाखतीत सांगितलं.
-
उर्सुला अभिनेत्री सोबतच एक उत्तम मॉडेल देखील आहे आणि हे फोटो त्याचे दाखले आहेत.
-
आजवर तिने अनेक मोठमोठ्या मासिकांसाठी शूट केलं आहे. (फोटो सौजन्य – उर्सुला/ इन्स्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग