-
संजय दत्त एकेकाळी त्याची बहीण प्रिया दत्तच्या लग्नावर नाखूश होता, पण नंतर त्याच्या दोन्ही बहिणी आपल्या भावाच्या लग्नावरून नाराज झाल्या होत्या. विशेषत: प्रिया दत्त आणि संजय दत्त यांच्यातील अंतर आणखी वाढताना दिसून आलं. जेव्हा प्रिय दत्तने संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तवर आरोप करताना भावाला जाळ्यात फसवल्याचं जाहीरपणे म्हटलं होतं, त्यावेळी संजय दत्त खूपच चिडला होता.
-
सुनील दत्त आणि नर्गिस यांचं त्यांच्या सर्व मुलांवर खूप प्रेम होतं. परंतु नर्गिस नंतर सुनील दत्त यांचं निधन झालं आणि त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टीवरून भावंडांमध्ये मतभेद होत गेले.
-
संजय दत्तपेक्षा 19 वर्षांनी लहान असलेल्या प्रिया दत्तने 2009 मध्ये मान्यता दत्तचा अपमान केला होता. प्रिया म्हणाली होती, "मान्यता संजयची पत्नी नाही किंवा ती सुनील आणि नर्गिस दत्तची सून नाही. या बाईने माझ्या भावाला जाळ्यात अडकवलंय", असं प्रिया म्हणाली होती.
-
बहिण प्रियाच्या तोंडून पत्नी मान्यतासाठी असं वक्तव्य ऐकून संजू बाबा संतापला होता. TOI ला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्तने म्हटलं होतं की, प्रिया कुटुंबातील मोठी सदस्य असल्याने त्याने आणि मान्यताने तिला माफ केलंय. मान्यता ही नर्गिस आणि सुनील दत्त यांची सूनच आहे, यात काही शंका नाही.
-
प्रियासोबतच नम्रताचा देखील संजयच्या लग्नाला विरोध होता. पण तिने कधीही जाहीरपणे काहीच सांगितलं नाही.
-
बहिणीवर नाराज झालेल्या संजय दत्तने तर प्रियाच्या आडनावावर खोचक टीका केली. त्यावेळी तो म्हणाला होता की, "लग्नानतंर प्रिया दत्तने तिच्या सासू-सासऱ्यांचं आडनाव आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत."
-
गेल्या काही काळात संजय दत्त आणि त्याची बहीण प्रिया दत्त हे दोघेही एकमेकांमधलं अंतर मिटवून आपल्या कॉंग्रेस पक्षाच्या प्रचारात एकत्र उभे होते.
-
मान्यता आणि संजय दत्त यांना दोन जुळी मुले आहेत. दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
-
मात्र, कालांतराने संजय आणि प्रिया यांच्यातील नात्यातील कटुता कमी झाली, पण प्रेम किती वाढले, तेच सांगू शकतील.
-
मान्यता संजय दत्तला एका बॉलिवूड पार्टीमध्ये भेटली असे म्हटले जाते. त्यावेळी संजय दत्त दुसऱ्या कुणामध्ये तरी गुंतला होता, अशी चर्चा होती संजयला मान्यतामधला साधेपणा भावला असे म्हटले जाते.

कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘ही’ फळं खा