-
मेट गाला हा एक एनुअल कॉस्ट्यूम फॅशन शो आहे. यात अनेक मोठ मोठे कलाकार आतरंगी ड्रेस परिधान करत फॅशनचा जलवा दाखवत असतात. यंदाच्या मेट गाला रेड कारपेटच्या वेळेस हॉलिवूडमधील ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री किम कार्दशियनकडेच्या अनोख्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
किम तिच्या अभिनयापेक्षा चित्रविचित्र पेहराव, वादग्रस्त वक्तव्य, लीक होणारे खासगी व्हिडीओ आणि मादक फोटोशूट यामुंळेच जास्त चर्चेत असते.
-
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील किमचा मेट गालाचा लुक खास आहे.
-
यंदा तिने स्वता:ला डोक्यापासून ते पाया पर्यंत काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये झाकले आहे.
-
तिच्या या अनोख्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
किमने हे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट मध्ये हा इवेंट पार पडला.
-
किमचा हा अनोखा लूक डिझायनर डेमना ग्वासालिया यांनी डिझाईन केला आहे.
-
किमने परिधान केलेला पोशाख झटपट चर्चेचा विषय बनला आणि तिला लगेचच तिचे २०२१ च्या सर्वात आकर्षक फॅशन क्षणांपैकी एक म्हणून शीर्षक देण्यात आले. तिने रेड कार्पेटवर सोलो एंट्री घेतली.
-
-
(Photo-Kim Kardashian/ Instagram)

ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे…