-
मुलगी ही एका फुलासारखी असते जी आपल्या आयुष्यात चैतन्याची ज्योत घेऊन येते.आज २६ सप्टेंबरला इंटरनॅशनल डॉटर्स डे साजरा केला जातो. आई-वडील आपल्या मुलीचे रक्षण करण्यासाठी नेहमीच तयार असतात. हे आई-वडिल आणि मुलगी यांच्यातील नाते सांगणारे अनेक चित्रपट आहेत. पाहुयात कोणते आहेत हे चित्रपट.
-
‘माॅ’ या चित्रपटाद्वारे मातृत्त्वाची एक वेगळी बाजू श्रीदेवीने प्रेक्षकांसमोर मांडली आहे.एका आई आपल्या मुलीसाठी, तिला न्याय मिळवून देण्यासाठी काहीही करु शकते हे या चित्रपटात पहायला मिळते.
-
“एकच थप्पड असेल, पण तो नाही मारू शकत..” इतकी थेट आणि सरळ भावना ‘थप्पड’ या चित्रपटाद्वारे तापसी पन्नू सांगताना दिसली आहे. या चित्रपटामधील तापसीच्या उत्तम अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
अभिनेत्री काजोल, तन्वी आज़मी, मिथिला पालकर प्रमुख भूमिका असलेला ‘त्रिभंगा- टेढ़ी मेढ़ी क्रेज़ी’ या चित्रपटात तीन पीढ्या दाखवण्यात आल्या आहेत.
-
‘दंगल’ या चित्रपटाद्वारे कुस्तीसारख्या पुरूषी खेळात नाव कमावलेल्या फोगट बहिणींची संघर्षपूर्ण कथा मांडण्यात आली आहे.
-
‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमात इरफान, करीना कपूर, राधिका मदन, दीपक डोब्रियाल, पंकज त्रिपाठी, रणवीर शौरी, डिंपल कपाडिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडील कशी प्रचंड मेहनत घेउ शकतात हे या चित्रपटात दिसते.
-
‘आम्ही दोघी’ या चित्रपटाची कथा दोन स्त्रियांच्या स्वभाव वैशिष्ट्यावर आणि त्यांच्या नात्यावर आधारित आहे. दोघांच्या वाटा वेगळ्या आहेत पण मार्ग एकचं… विचार वेगळे पण आवड एकच…त्या वेगळ्या, पण तरीही एकच…. ही कथा आहे अमला आणि सावित्री सरदेसाई या दोघींची.

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..