-
सौंदर्य आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजे रेखा!
-
सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल मारली. आजही त्या तेवढ्याच सुंदर आणि उत्साही दिसतात.

बॉलिवूडमध्ये आपल्या सदाबहार अभिनयाने आतापर्यंत अधिराज्य गाजवत आलेल्या अभिनेत्री रेखा यांचा आज ६७ वा वाढदिवस आहे. -
रेखा यांचे खरे नाव भानुरेखा गणेशन. पण, अजूनही बऱ्याचशा लोकांना हे नाव पटकन लक्षात राहत नाही.
-
बेबी रेखा या नावाने त्यांनी प्रथम तेलगू चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले.
-
१९७० मध्ये ‘सावन भादों’ या चित्रपटापासून त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली.
-
रेखा यांच्या सौंदर्यावर न भाळलेली व्यक्ती दुर्मिळच..
-
१९८१ साली आलेल्या मुजफ्फर अली निर्मित ‘उमराव जान’ने रेखा यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.
-
रेखा यांनी आत्तापर्यंत १८० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध केले आहे.
-
१९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फटाकडी’ या मराठी चित्रपटामध्ये ‘कुठं कुठंठ जायाच हनिमुनला..’ या लावणीवर त्यांनी केलेले नृत्य प्रचंड गाजले.
-
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या जोडीला आजही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलेले आहे. ही जोडी बॉलिवूडमधली हीट जोडी ठरली होती.
-
अमिताभ यांच्याबरोबर चित्रीत झालेला ‘सिलसिला’ हीट चित्रपट ठरला होता. संयोगाची गोष्ट म्हणजे, आज रेखा यांचा वाढदिवस आहे आणि बीग बी अमिताभ यांचा उद्या म्हणजे ११ ऑक्टोबरला.
-
रेखा या राज्यसभा सदस्य आहेत. राष्ट्रपतींच्या विशेष अधिकाराने मे २०१२ मध्ये त्यांची राज्यसभेवर नेमणूक झाली. (सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेस)
रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती