-
बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीने तिच्या डान्स आणि ग्लमरस अंदाजाने बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान निर्माण केलंय.
-
नोराने तिच्या डान्सच्या जोरावर खास करून बेली डान्समुळे चाहत्यांची मोठी पसंती मिळवली आहे.
-
नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं असलं तरी एकेकाळी नोराला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
-
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी नोरा कॅनेडा एका हॉटेलमध्ये वेटरेसचं काम करत होती. यावेळी नोरा खूपच बारिक होती. कॅनडातील लोकांना हडकुळ्या मुली आवडत नसल्याने यावेळी बॉडी शेमिंगचा सामना करावा लागल्याचा खुलासा नोराने केला.
-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नोरा म्हणाली, “कॅनडामध्ये बारिक असणं फारसं आवडतं नाही. तिथली ती एक प्रकारची मानसिकता आहे आणि त्यामुळेच आम्ही सारखं खात असायचो.” असं ती म्हणाली.
-
यावेळी तिने हॉटेलमधील कामाचा अनुभव शेअर केला. “वेट्रेस होणं खूप कठीण आहे. आपल्याकडे संभाषण कौशल्य आणि चांगलं व्यक्तिमत्व असणं आवश्यक आहे. शिवाय उत्तम स्मरणशक्ती हवी. कधी कधी विचित्र लोक हॉटेलमध्ये येतात. यावेळी परिस्थिती हाताळण्यास सक्षम असणं गरजेचं असतं”
-
यावेळी नोराने ती खाद्य प्रेमी असल्याचं सांगत असतानाच ती तिच्या फिगरकडे कसं लक्ष देते हे सांगितलं.
-
नोरा म्हणाली , “मी अशा संस्कृतीतून आलेय जिथे बारिक किंवा सडपातळ असणं चांगलं समजलं जात नाही.
-
“इथे स्त्रींयांनी थोडं जाड आणि वळणदार म्हणजेच सुडौल बांधा असलेलं लोकांना आवडतं. त्यामुळे मी नेहमीच जाड आणि सुडौल होण्याचा तसचं वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असते.”
-
ही सांस्कृतीक मानसिकता असल्याने सतत खाण्याची आवड असल्याचं नोरा म्हणाली.
-
नोरा फतेहीने सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो शेअर करत ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.
-
नोरा लवकरच ‘सत्यमेव जयते २’ या सिनेमात झळकणार आहे. (All Photo-instagram@norafatehi)

Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा