-
मराठी कलाविश्वात अनेक नावाजलेले विनोदवीर आहेत. त्यामधील एक अतिशय लोकप्रिय नाव म्हणजे अभिनेता, विनोदवीर भाऊ कदम.
-
आपल्या विनोदबुद्धीने आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत भाऊ कदमने अनेकांच्या मनात घर केले आहे.
-
आज महाराष्ट्राच्या घराघरात भाऊ कदम हे नाव पोहोचले आहे. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
-
भाऊ कदम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचं खरं नाव भालचंद्र कदम असं आहे. मात्र चाहते त्याला प्रेमाने भाऊ कदम असंच म्हणतात.
-
भाऊ कदम यांची कन्या मृण्मयी कदम सोशल मीडियावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहतेय.
-
मृण्मयीने के. जी. जोशी आणि एन. जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केलं.
-
मृण्मयीचं स्वत:चं युट्युब चॅनल असून त्याचे हजारो सबस्क्राइबर्स आहेत.
-
सध्या मृण्ययी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी येथे पुढचं शिक्षण घेत आहे.
-
मृण्मयीने स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु केला आहे.
-
‘तारुंध्या’ असं मृण्मयीच्या ब्रॅण्डचं नाव आहे.
-
मृण्मयीचा ‘ट्रेंडी हेअर बो’ (Scrunchies) चा व्यवसाय आहे.
-
तरुणांमध्ये हा ब्रॅण्ड चांगलाच लोकप्रिय आहे.
-
चाहत्यांनी मृण्मयीचे कौतुक केले असून तिला नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
-
भाऊ कदमसारखंच अभिनय क्षेत्रात काम करणार का यावर मृण्मयी म्हणाली, “आधी शिक्षण पूर्ण करायचं आहे. पण जर संधी मिळाली तर अभिनय नक्की करायला आवडेल.”
-
मृण्मयीशिवाय भाऊला दोन मुली आणि एक मुलगा आहे. संचिता, समृद्धी आणि आराध्य अशी त्यांची नावं आहेत.
-
मृण्मयी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
-
मृण्मयीच्या चाहत्यांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी कदम / इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल