-
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला क्रूझवरील पार्टीप्रकरणी उच्च न्यायालयाने गुरुवारी (२८ ऑक्टोबर) जामीन मंजूर केला. (आणखी वाचा : शाहरुखने दिलेले ४५०० रुपये आर्यन खानने जेलमध्ये कसे केले खर्च?)
-
जवळपास २६ दिवसांनंतर आर्यन खानला जामीन मिळाला आहे.
-
आर्यनसोबत मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांचा देखील जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला.
-
आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्या लीगल टीमची नियुक्त करण्यात आली होती.
-
आर्यनच्या जामीनाच्या प्रत्येक सुनावणीदरम्यान ही सर्व टीम न्यायालयात हजर होती.
-
या टीमने एनसीबीने आर्यनच्या जामिनाला केलेला विरोध खोडून काढणारा युक्तिवाद केला. यात ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांचा युक्तिवाद प्रचंड गाजला.
-
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आर्यन आणि अन्य दोन याचिकाकर्त्यांचा जामीन मंजूर केला.
-
यानंतर मुकुल रोहतगी आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
-
पण दुसरीकडे मुकुल रोहतगी एका सुनावणीसाठी किती फी घेतात? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकुल रोहतगी एका सुनावणीसाठी जवळपास १० लाख रुपये फी घेत असल्याचे म्हटले जात आहे.
-
एका RTI मध्ये देण्यात आलेल्या उत्तरात महाराष्ट्र सरकारने सांगितले होते की वरिष्ठ काउंसिल मुकुल रोहतगी यांना महाराष्ट्र सरकाने जज बीएच लोया केससाठी जवळपास १.२१ कोटी रुपये फी म्हणून दिली होती.
-
मुकुल यांनी २००२ साली झालेल्या दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुजरात सरकारची बाजू मांडली होती.
-
तसेच, बनावट चकमक प्रकरणातही त्यांनी गुजरात सरकारच्या बाजूने न्यायालयात युक्तिवाद केला होता.
-
मुकुल यांचे वडील अवध बिहारी रोहतगी हे उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.
-
१८ जून २०१७ पर्यंत मुकुल रोहतगी हे देशाचे १४वे अॅटर्नी जनरल होते.

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर