-
बॉलिवुडचा किंग खान शाहरुखला सगळ्यात मोठा दिलासा मिळाला असून त्याचा मुलगा आर्यन खानला २५ दिवस आर्थर रोड जेलमध्ये घालवल्यानंतर जामीन मिळाला आहे.
-
शनिवारी म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी आर्यन खानची आर्थर रोड जेलमधून सुटका झाली आहे. त्याला जामिनावर सोडण्यात आलं असून मुंबई उच्च न्यायालयानं १४ अटी देखील आर्यन खानला पाळण्यास बजावलं आहे. या पार्श्वभूमीवर खान कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-
पण आपल्या मुलाला तुरुंगातून परत आणण्यासाठी शाहरुख खाननं आपल्या सर्वात विश्वासू बॉडीगार्ड रवी सिंहला पाठवलं होतं.
-
रवी सिंह गेल्या अनेक वर्षांपासून शाहरुखसोबत असून तो शाहरुखचा सर्वात विश्वासू बॉडीगार्ड असल्याचं सांगितलं जात आहे.
-
पण हा रवी सिंह कोण आहे, याची चर्चा आर्यन खान प्रकरणाच्या अनुषंगाने सुरू झाली आहे. विशेष म्हणजे कालच्या आर्यनच्या सुटकेनंतर वरीच्या पगाराचा आकडाही अनेकांचे डोळे पांढरे करत असल्याचं चित्र दिसत आहे.
-
शाहरुखच्या बॉडीगार्डचा पगार हा एखाद्या मल्टी नॅशनल कंपनीच्या सीईओपेक्षाही अधिक आहे. जाणून घेऊयात रवी आणि त्याच्या शाहरुखसोबतच्या नात्याबद्दल…
-
गेल्या अनेक दिवसांपासून आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी असो किंवा एनसीबी कार्यालयातील चौकशी असो, रवी सिंह अनेकदा या ठिकाणी दिसून आला आहे.
त्यामुळे काल आर्यन तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर त्याला घ्यायला रवी सिंह आल्याचं पाहयला मिळालं. -
प्रसार माध्यमे, चाहते यांच्या एवढ्या गराड्यामधून मुलाला सुरक्षित घरी आणण्यासाठी शाहरुखने रवीची निवड केली यावरुन शाहरुखच्या लेखी त्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
-
रवी सिंह साधारणपणे गेल्या १० वर्षांपासून शाहरुख खानसोबत त्याचा बॉडीगार्ड म्हणून काम करतोय.
-
रवी अगदी सावलीप्रमाणे शाहरुख खानसोबत असतो.
-
१३ ऑक्टोबर रोजी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी मुंबईच्या सत्र न्यायालयात आली असताना देखील रवी सिंह तिच्यासोबत होता. शाहरुख आर्यनला भेटण्यासाठी आर्थ रोड तुरुंगात गेला होता तेव्हाही रवी त्याच्यासोबत होता.
-
रवी सिंह हा शाहरुखच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रमुख आहे.
-
आयपीएलचे सामने असो, शूटींग असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम शाहरुख रवीशिवाय मन्नतच्या बाहेर पडत नाही असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
-
परदेशामध्येही रवीच शाहरुख सोबत असतो.
-
रवीवर शाहरुखसोबतच त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचीही जबाबदारी आहे.
-
आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचं देखील काम रवी सिंह करतो.
-
शाहरुख खानचं पूर्ण दिवसाचं वेळापत्रक रवी सिंहकडे असतं.
-
रवी शाहरुख घराबाहेर सार्वजनिक जिवनात वावरतो तेव्हा प्रत्येक वेळी त्याच्यासोबत असतो.
-
२०१४ मध्ये रवी सिंह एका अडचणीत सापडला होता.
-
मिळालेल्या माहितीनुसार, रवी सिंहला वांद्रे पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं. मात्र, काही तासांनी त्याला सोडून देण्यात आलं.
-
एका पुरस्कार सोहळ्याच्या वेळी शाहरुखसोबत आलेला असताना रवी सिंहनं मराठी अभिनेत्री शर्वरीला हटकलं होतं.
-
शर्वरीकडे व्हीआयपी पास असूनदेखील तिच्याशी रवी सिंहचा वाद झाला होता.
-
गर्दी नियंत्रित करण्यासाठी त्यानं शर्वरीला हटकल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या प्रकरणात त्याला समज देऊन सोडण्यात आलं होतं.
-
शाहरुख खानचा सर्वात विश्वासू बॉडीगार्ड असण्याबरोबरच रवी सिंह बॉलिवुडमधला सर्वात महाग बॉडीगार्डपैकी एक असल्याचं बोललं जातं.
-
रवी सिंहला शाहरुख खान दर वर्षाला तब्बल २ कोटी ७ लाख रुपये पगार देत असल्याची माहिती बॉलिवूड लाईफने दिलेली.
-
हा आकडा खरा धरला तर रवीला शाहरुखला सुरक्षा पुरवण्यासाठी महिन्याचे २२ लाख ५० हजार दिले जातात असं दिसून येत आहे. (सर्व फोटो इंडियन एक्सप्रेस, पीटीआय आणि सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

बापरे! तरुण ११० च्या स्पीडला बुलेट पळवत होता; अचानक ब्रेक मारला अन्… क्षणार्धात घडला भयंकर अपघात, लाईव्ह VIDEO व्हायरल