-    दरवर्षी अनेक चित्रपटांची निर्मिती केली जाते. ते वेगवेगळ्या भाषेत बनवले जातात. 
-    चित्रपट निर्मिती हा जगातील सर्वात मोठा व्यवसाय मानला जातो. 
-    जगभरातील लाखो कोट्यावधी लोक या व्यवसायाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जोडले आहेत. 
-    भारतातील ‘बॉलिवूड’ इंडस्ट्री ही जगातील सर्वात मोठ्या चित्रपट उद्योगांपैकी एक मानली जाते. 
-    ‘बॉलिवूड’ इंड्रस्टीचे एकूण मूल्य जवळपास १८३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. 
-    भारतासह जगभरात सिनेसृष्टीला विविध नावे देण्यात आली आहे. 
-    ‘हॉलिवूड’, ‘बॉलिवूड’, ‘टॉलीवूड’ या नावाने सिनेसृष्टीला ओळखले जाते. 
-    भारतातील विविध भाषांमधील सिनेसृष्टी ही ‘बॉलिवूड’, ‘कॉलिवूड’, ‘लॉलिवूड’ आणि ‘टॉलिवूड’ अशा नावाने प्रसिद्ध आहे. 
-    पण सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या या शब्दांमध्ये ‘वूड’ हा शब्द का वापरला जातो? यामागचे नेमके कारण का? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? मग चला जाणून घेऊ. 
-    सिनेसृष्टीत ‘वूड’ हा शब्द नेमका कुठून आला? त्याची सुरुवात नेमकी कुठून झाली? याचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. 
-    ‘वूड’ हा शब्द मुख्यत्वे ‘हॉलिवूड’, ‘बॉलिवूड’, ‘टॉलिवूड’ यासारख्या सिनेसृष्टीत वापरला जातो. याची सुरुवात ‘हॉलिवूड’पासून झाली होती. 
-    एच. जे. विटले (H.J. Whitley)यांना हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनीच ‘हॉलिवूड’ चित्रपटांची सुरुवात केली होती. 
-    ‘हॉलिवूड’ या नावामागे एक रंजक कथा सांगितली जाते. 
-    अमेरिकेतील लॉस एंजेलिस या शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या ‘हॉलिवूड’ नावाचा एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या नावावरुन एच. जे यांनी या इंडस्ट्रीला नाव दिले होते. 
-    त्यानंतर इतर चित्रपट इंडस्ट्रीने याच नावातील ‘वूड’ हा शब्द फॉलो करत सिनेसृष्टीला विविध नावे दिली. 
-    यात ‘बॉलिवूड’, ‘टॉलिवूड’, ‘कॉलिवूड’, ‘लॉलीवूड’, ‘सँडलवूड’ यासारख्या अनेक राज्यातील सिनेसृष्टीतील नावांचा समावेश होतो. 
-    हिंदी सिनेसृष्टीला ‘बॉलिवूड’ या नावाने ओळखले जाते. मुंबई किंवा बॉम्बे हे हिंदी सिनेसृष्टीतील प्रमुख स्थान आहे, त्यामुळेच याला ‘बॉलिवूड’ असे म्हणतात. 
-    पाकिस्तानमधील लाहौर हे त्या ठिकाणच्या सिनेमाची राजधानी मानली जाते. त्यामुळे पाकिस्तानच्या सिनेसृष्टीला ‘लॉलीवूड’ असे म्हणतात. या ठिकाणी पंजाबी आणि उर्दू भाषेत चित्रपटांची निर्मिती केली जाते. 
-    ‘कॉलिवूड’ हे नाव तामिळ चित्रपटसृष्टीसाठी वापरले जाते. 
 - ‘सँडलवूड’ हे नाव कन्नड सिनेसृष्टीसाठी वापरण्यात येते. 
-    तर तेलगू सिनेसृष्टीसाठी ‘टॉलिवूड’ हे नाव वापरले जाते. 
 
  सूरजच्या नव्या घराची पहिली झलक! अंकिताने पाहिलं भावाचं ‘ड्रीम होम’, नवीन बंगल्यात करणार बायकोचं स्वागत, पाहा… 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  