-
बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी म्हणजेच रणवीर सिंह आणि दीपिका पदूकोण यांच्या लग्नाला आज तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. १४ नोव्हेंबर २०१८ सालामध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती.
-
दीपवीरच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात.
-
दीपिका-रणवीरने ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले.
-
रामलीला चित्रपटापासूनच दीप-वीरच्या लव्हस्टोरीला खऱ्या अर्थाने सुरु झाली होती.
-
या चित्रपटातील ‘अंग लगा दे रे’ या गाण्याच्या चित्रीकरणावेळी हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं साऱ्यांच्या लक्षात आलं.
-
या गाण्यात एक किस सीन होता. हा सीन पूर्ण झाल्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी कट असं म्हटलं, मात्र तरीदेखील या दोघांचं लक्ष नव्हतं. कट म्हटल्यानंतरही ते एकमेकांना किस करत होते, याच सीनवरुन ते एकमेकांच्या प्रेमात असल्याचं उपस्थितांच्या लक्षात आलं.
-
दीपिका आणि रणवीरला एकत्र आणण्यास संजय लीला भन्साली यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे म्हटले जाते. कारण या कपलने भन्सालींच्या एक नाही तर तीन चित्रपटात एकत्र काम केले.
-
रामलीला सिनेमानंतर दोघं भन्साळींच्या ‘बाजीराव- मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटात एकत्र झळकले. दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती.
-
दोघांनी एकमेकांना जवळपास ६ वर्ष डेट केलं. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
रामलीला सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं असलं तरी दोघांची पहिली भेट सिंगापूरमध्ये एका अवॉर्ड शोमध्ये झाली होती.
-
यशराज स्टुडिओमध्ये दीपिका एकदा शूटिंग करत असताना तिथे रणवीरही आला होता. ही त्यांची दुसरी भेट होती. यावेळी दोघे पहिल्यांदा एकमेकांशी बोलले होते असा खुलासा दीपिकानेच एका मुलाखतीत केला होता.
-
“रणवीर त्यावेळी अन्य एका मुलीला डेट करत असतानाही माझ्याशी फ्लर्ट करत होता. बराच काळ गेल्यानंतर न राहावून मी त्याला तू माझ्याशी फ्लर्ट करत आहेस का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने अजिबात नाही, असं उत्तर त्याने दिलं. त्याचं हे उत्तर ऐकून मी ठामपणे तू माझ्याशी फ्लर्ट करत आहेस”,असं दीपिता म्हणाली होती असा खुलासा तिने या मुलाखतीत केला होता.
-
यानंतर ‘रामलीला’ सिनेमाच्या प्रोजेक्टसाठी दोघं संजय लीला भन्साळींच्या घरी भेटले होते.
-
त्यानंतर दीपिका रणवीरमध्ये बऱ्याच गप्पा झाल्या.त्यानंतर रणवीर खूप स्पेशल वाटू लागला होता असा खुलासा दीपिकाने केला होता.
-
दीपिका आणि रणवीरच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रमाणे त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्रीदेखील चांगलीच गाजली होती.
-
२०१८ सालामध्ये १४ आणि १५ नोव्हेंबरला इटलीतल्या लेक कोमो परिसरात असलेल्या एका आलिशान व्हिलामध्ये आधी कोंकणी आणि मग सिंधी पद्धतीनं दीपिका आणि रणवीरचा विवाहसोहळा पार पडला.
-
या शाही विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
-
लग्नानंतर दीप- वीरने मित्रपरिवारासाठी बेंगळुरू आणि मुंबईत स्वागत-समारंभाचं आयोजन केलं होतं.
-
लवकरच ते पुन्हा एकदा ’83’ चित्रपटात एकत्र झळकणार आहे.

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग