-
वादविवाद, भांडणं, एकमेकांवर कुरघोडी, आरोप-प्रत्यारोप, अफेअर्स या सर्वांसाठी ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो ओळखला जातो.
-
‘बिग बॉस’च्या घरात शिव ठाकरे आणि वीणा जगताप या दोघांमध्ये प्रेम फुललं होतं.
-
वीणाने तिच्या हातावर ‘शिव’ नावाचा टॅटू काढत प्रेम व्यक्त केलं होतं.
-
‘बिग बॉस’च्या घरात वीणाने तिच्या पापण्यांवर शिवचं नाव कोरल्याचं पाहायला मिळालं होतं.
-
चाहत्यांनाही या दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेण्यात फार उत्सुकता आहे.
-
पण गेल्या काही दिवसांपासून शिव आणि वीणाचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
या चर्चा सोशल मीडियावर एकमेकांसाठी सतत पोस्ट करणारे शिव आणि वीणा आता एकमेकांविषयी काही बोलत नसल्यामुळे सुरु झाल्या आहेत.
-
शिव आणि वीणा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असल्याची चर्चा आहे.
-
लोकमतला दिलेल्या मुलाखतीत शिव म्हणाला, ‘सध्या आम्ही दोघे आमच्या कामांमध्ये व्यग्र आहोत. मी माझ्या कामात खुश आहे आणि वीणा तिच्या कामामध्ये खुश आहे. आमच्या दोघांवर बाप्पाची कृपा आहे. टॅटूबद्दल मला काही माहिती नाही.’
-
वीणाने शिवच्या नावाचा टॅटू हटवला आहे.
-
विशेष म्हणजे या टॅटूच्या जागी तिने पानाचा टॅटू गोंदवून घेतला असून हा नवा टॅटू चर्चेचा विषय ठरत आहे.
-
शिवच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केलीय.
-
मात्र प्रत्यक्षात नेमकं काय घडलंय. याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
-
‘बिग बॉस मराठी २’चा विजेता शिव ठाकरे ठरला आणि वीणाने टॉप ३ पर्यंत मजल मारली होती.
-
‘बिग बॉस मराठी २’ हा शो जिंकल्यानंतर शिवला १७ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिव ठाकरे, वीणा जगताप / इन्स्टाग्राम)

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल