-
१०० दिवस, १७ सदस्य आणि एक ट्रॉफी! बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन घरात आला.
-
कार्यक्रमाच्या तिसर्या पर्वाला देखिल संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले.
-
प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकायला पहिल्या भागापासून सुरुवात केली.
-
प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपरामध्ये फक्त ‘बिग बॉस’ मराठीची चर्चा रंगत गेली. मग ती टास्कविषयी असो, घरात होणार्या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्या नात्यांविषयीची असो.
-
‘बिग बॉस’ मराठीच्या तिसर्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला.
-
आणि शेवटी तो क्षण आला ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पहात होता, महाराष्ट्राला ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसर्या पर्वाचा विजेता मिळाला.
-
विशाल निकम ठरला ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसर्या पर्वाचा विजेता तर जय दुधाणेने पटकावले दुसरे स्थान.
-
विशाल निकमला २० लाख इतकी धनराशी मिळाली आणि ट्रॉफी.
-
खेळाडूवृत्ती, टास्क जिंकण्याची त्याची जिद्द, घरातील वावर, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहेमीच चर्चेत राहिला.
-
सध्या सोशल मीडियावर विशालवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेतून विशालने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
-
विशालचा अभिनयाचा प्रवास मात्र वाटतो तितका सोपा नाही.
-
मुळचा सांगलीकर असणाऱ्या विशालला लहानपणापासूनच अभिनयाचं वेड होतं.
-
वडील शेतकरी, घरात कुणीही अभिनय क्षेत्रात नाही. अश्या परिस्थितीतही विशालने आपला हट्ट सोडला नाही.
-
मास्टर इन फिजिक्सची पदवी आणि सोबतीला अभिनयाचे धडे घेत असताना त्याने स्वप्नांचा पाठलाग करत मुंबई गाठली.
-
अभिनय क्षेत्रात पाऊल कसं टाकावं याची माहिती मिळवण्यासाठी त्याने मुंबईतल्या एका जिममध्ये पर्सनल ट्रेनर म्हणून कामाला सुरुवात केली.
-
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतून विशाल प्रसिद्धीझोतात आला.
-
विशालने ‘मिथुन’ आणि ‘धुमस’ या चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत.
-
अभिनय क्षेत्रात यायचं तर फिटनेसशिवाय पर्याय नाही याची त्याला जाणीव होती आणि आहे. त्यामुळेच तर शूटिंगच्या वेळा सांभाळत तो फिटनेसवरही तितकीच मेहनत घेतो.
-
अभिनयासोबतच डान्स, मार्शल आर्ट्स आणि तलवार बाजीचंही विशालने प्रशिक्षण घेतलं आहे.
-
क्रिकेटमध्येही विशाल पारंगत आहे.
-
विशालच्या जिद्दीची ही कहाणी तमाम तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
-
सिनेमातल्या एखाद्या गोष्टीप्रमाणेच विशालची कहाणी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : विशाल निकम / इन्स्टाग्राम)

Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार