-
ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे करोनामुळे निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या. त्यांनी अनेक हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये प्रमुख तसेच साहाय्यक भूमिका केल्या होत्या. अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे.
-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘जीव झाला येडापिसा’मध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे निधन झाले. करोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. १९ मे रोजी हेमंत यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता उज्ज्वल धनगर याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
-
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे करोनामुळे निधन झाले. त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
मराठमोळी अभिनेत्री अभिलाषा पाटीलचं करोनामुळे निधन झाले. अभिलाषाने ‘प्रवास’, ‘तुझं माझं अरेंज मॅरेज’, ‘पिप्सी’ अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याचसोबत तिने ‘बापमाणूस’ या मालिकेतही महत्वाची भूमिका साकारली होती. याच सोबत ती ‘छिछोरे’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ अशा हिंदी चित्रपटांसोबत काही हिंदी वेब सीरिजमध्ये झळकली होती.
-
२०१७ सालातील ‘कोर्ट’ हा चित्रपट चांगलाच गाजला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटातील अभिनेते वीरा साथीदार यांचे करोनामुळे निधन झाले. वीरा साथीदार यांनी कोर्ट चित्रपटात पहिल्यांदा अभिनय केला. या चित्रपटाने ऑस्करपर्यंत मजल मारली. ‘बेस्ट फॉरेन फिल्म’ या श्रेणीत ‘कोर्ट’ चित्रपटाची निवड झाली होती.

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”