-
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सुरु झालीय लगीनघाई.
-
बऱ्याच दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती त्या अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे.
-
या विवाहसोहळ्यासाठी संपूर्ण देशमुख कुटुंब उत्साहात असून खास संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय.
-
या संगीत सोहळ्यात देशमुख कुटुंबाने रेट्रो लूक धारण केलाय.
-
अनिरुद्ध-संजना, अभिषेक-अनघा, माई-अप्पा, यश-गौरी आणि इशाने सदाबहार मराठी गाण्यांवर ठेका धरत संगीत सोहळ्याची रंगत द्विगुणीत केली आहे.
-
या संगीत सोहळ्यात आशुतोषही सामील झाला आहे.
-
अरुंधती आणि आशुतोषमधील ही वाढती मैत्री अनिरुद्धला मात्र खटकते आहे.
-
त्यामुळे एकीकडे आनंदाचं वातावरण असताना अनिरुद्ध मात्र अस्वस्थ आहे.
-
देशमुख कुटुंबातला हा अनोखा विवाहसोहळा मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहे.

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच EVMची फेरमतमोजणी; तीन वर्षांनंतर फिरला निवडणुकीचा निकाल