-
एकेकाळच्या बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अमृता सिंह.
-
अमृता सिंहने अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकली होती.
-
१९९१ साली अमृताने १२ वर्षांनी लहान असणाऱ्या सैफ अली खानशी लग्न केले होते.
-
त्यांना इब्राहिम आणि सारा अली खान ही दोन मुले आहेत.
-
पण सतत होणाऱ्या भांडणामुळे २००४मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला.
-
त्यानंतर २०१२मध्ये सैफने करीना कपूरशी लग्न केले.
-
पण दुसऱ्या लग्नानंतरही सैफ त्याच्या मुलांना भेटत असे त्यांच्यासोबत वेळ घालवत असे.
-
सध्या अमृता सारा आणि इब्राहिमसोबत राहते.
-
सारा ही बॉलिवूडमधील सध्याची अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
सारा आणि सावत्र आई करीना कपूर यांच्यामध्ये देखील चांगले नाते आहे.
-
पण काही दिवसांपूर्वी साराची सावत्र आई करीनासोबतची जवळीक अमृताला आवडत नसल्याचे म्हटले जात होते.
-
पण यावर अमृताने वक्तव्य करत पूर्णविराम दिला आहे.
-
‘या सर्व अफवा आहेत. सारा आणि करीनामध्ये असलेल्या नात्यामुळे मला अजिबात त्रास होत नाही. त्या दोघींमध्ये चांगले मैत्रीचे नाते आहे’ असे अमृता म्हणाली.
-
पुढे ती म्हणाली, ‘मी स्वत: सैफ आणि करीनाच्या लग्नात सारा आणि इब्राहिमला तयार केले होते. त्यांच्या कपड्यांची निवड केली होती.’

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”