-
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. कॉंग्रेसकडून १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला तिकिट देण्यात आले आहे. तसेच ‘बिकिनी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अर्चना गौतमला देखील तिकिट देण्यात आले आहे.
-
अर्चना ही मेरठ येथील हस्तिनापूर विधानसभा मतरदार संघातून निवडणूक लढणार आहे.
-
पण अर्चना गौतम नक्की कोण आहे? असा प्रश्न पडला आहे. चला तिच्या विषयी जाणून घेऊया…
-
अर्चना ही २६ वर्षांची आहे.
-
ती २०१४मध्ये मिस उत्तर प्रदेश ठरली होती.
-
त्यानंतर तिने मिस बिकिनी इंडिया आणि मिस बिकिनी युनिव्हर्स या स्पर्धा जिंकल्या.
-
२०१८मध्ये तिने मिस कॉसमॉस वर्ल्ड या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
-
अर्चना ही एक अभिनेत्री, मॉडेल आहे.
-
तिने काही ब्युटी कॉन्टेस्ट जिंकले आहेत.
-
अर्चनाने ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या चित्रपटात काम केले आहे.
-
या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
अर्चनाने या चित्रपटानंतर हसिना पारकर आणि बारात कंपनीमध्ये काम केले.
-
तिने ‘जंक्शन वाराणसी’ या चित्रपटात आयटम साँग केले.
-
त्यासोबतच तिने काही म्युझिक व्हिडीओ देखील केले आहेत
-
आयआयएमटीमधून बीजेएमसी विषयात तिने पदवी घेतली होती.
-
दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अर्चना ही ‘बिकिनी गर्ल’ म्हणून ओळखली जाते.
-
लवकरत ती IPL…it’s Pure Love या तेलुगू चित्रपटात दिसणार आहे.
-
तसेच गुंडाज आणि 47A या तामिळ चित्रपटांमध्ये ती काम करताना दिसणार आहे.
-
तिने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे.
-
काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या अर्चनाची जादू राजकीय पटलावर चालते का? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘मेरा दादला’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक