-
दाक्षिणात्य अभिनेता धनुषने सोमवारी आपला १८ वर्षांचा संसार मोडत, पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून वेगळे होण्याची घोषणा केली.
-
प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचे २००४ मध्ये लग्न झाले आणि त्यांना यात्रा राजा आणि लिंगा राजा ही दोन मुले आहेत.
-
धनुष आणि ऐश्वर्या यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपण विभक्त झाल्याची घोषणा देखील केली आहे.
-
२००२ मध्ये ‘कडहाल कोंडेन’च्या स्क्रीनिंगच्या वेळी ऐश्वर्या आणि धनुष यांची पहिली भेट झाली.
-
चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ऐश्वर्या वडील रजनीकांत यांच्यासोबत आली होती.
-
त्यावेळी धनुषचं परफॉर्मन्स पाहून ती त्याच क्षणी त्याच्या प्रेमात पडली होती.
-
विशेष म्हणजे स्क्रिनिंगच्या दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्याने धनुषच्या घरी पुष्पगुच्छ पाठवत त्याला संपर्कात रहा असं सांगितलं.
-
ऐश्वर्याने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर या दोघांची मैत्री वाढत गेली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
-
ऐश्वर्या धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.
-
२००४ रोजी धनुष आणि ऐश्वर्याने घरातल्यांच्या संमतीने लग्न केलं.
-
या दोघांचा लग्न सोहळा दाक्षिणात्य कलाविश्वातील गाजलेल्या लग्नसोहळ्यांपैकी एक आहे.
-
२०१३ मध्ये ‘रांझना’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा धनुष हा केवळ उत्तम अभिनेताच नव्हे तर तो एक चांगला गायक देखील आहे.
-
काही वर्षांपूर्वी त्याचं ‘व्हाय दीस कोलावरी डी’ हे गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं.
-
ऐश्वर्या एक उत्तम नर्तिका असून तिने शास्त्रीय नृत्याचे धडे घेतलेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”