-
झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.
-
केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे.
-
या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे की मराठी सोबत हिंदी कलाकार सुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात.
-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांनी नुकतंच ‘चला हवा येऊ द्या’ सेटवर हजेरी लावली.
-
पुढील आठवड्यात प्रेक्षकांना हे विशेष भाग पाहायला मिळतील.
-
खिलाडी अक्षय कुमार याने फक्त या मंचावर हजेरीच नाही लावली तर त्याच्या ढासू स्टाईलमध्ये क्रिती सोबत एक जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा दिला.
-
त्यांचा हा परफॉर्मन्स इतका अफलातून होता की टाळ्या आणि शिट्या थांबल्याचं नाहीत.
-
अक्षय आणि क्रिती त्यांचा आगामी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आले होते.
-
‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अक्षय कुमार यांचा मराठमोळा अंदाज देखील प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
-
खिलाडी कुमार मंचावर आला आहे म्हणून विनोदवीरांनी खूप कल्ला केला.
-
अक्षयने देखील या विनोदवीरांसोबत मिळून खूप धमाल केली.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल