-
आपल्या अभिनयाने व सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
अभिनयासोबतच प्राजक्ताला भटकंतीची फार आवड आहे.
-
शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून प्राजक्ता आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देते.
-
नुकतीच प्राजक्ता आईसोबत दुबईला फिरायला गेली आहे.
-
‘गेली २-३ वर्ष आईला बाहेर देशात फिरायला जायचं होतं. शूटींगमधून सुट्टी आणि उतरणीला लागलेले कोविड नियम बघून आम्ही दोघी दुबईला आलो. #आम्हीदोघी #मायलेक #श्रावणबालिका #झिम्मा #मज्जा’ असं कॅप्शन देत प्राजक्ताने हे फोटो शेअर केले आहेत.
-
प्राजक्ता सध्या दुबईतल्या निसर्गात मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटतेय.
-
‘दुबई टूर’चे बरेच फोटो प्राजक्ताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने हिरव्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
आई आणि प्राजक्ता मज्जा करताना…
-
या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
-
प्राजक्ताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी / इन्स्टाग्राम)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक